27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunकोरोना संबंधित शासनाची मदत मिळण्यास विलंब केल्यास, नातेवाइकांसह आंदोलनाचा इशारा

कोरोना संबंधित शासनाची मदत मिळण्यास विलंब केल्यास, नातेवाइकांसह आंदोलनाचा इशारा

वारसांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळावी यासाठी मृतांच्या वारसांना ऑनलाईन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. सुरुवातीला कोरोन प्रबंधित लस उपलब्ध नसल्याने, अनेकांना उपचाराविना आपला जीव गमवावा लागला. अचानक आलेल्या संकटामुळे आणि आप्तस्वकीयांचा मृत्यू ओढवल्यामुळे कुटुंब सर्व हादरून गेले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष स्त्रियाच गेल्याने अनेकांवर उपजीविका कशी करायची असे प्रश्न उभे ठाकले. शासनाने मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र ऑनलाईन साईटवर भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या वेळेमुळे निधी खात्यात जमा होण्यास वेळ लागत आहे. त्याबाबत वारसांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी चिपळूणचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने जाहीर केलेली ५० हजार रुपयांची मदत मृतांच्या वारसांना देण्यास विलंब होत आहे. तरी ती तातडीने द्यावी अन्यथा संबंधित नातेवाईकांना घेवून तहसिलदार कार्यालयात बसेन असा इशारा माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी दिला आहे.

या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या वारसांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळावी यासाठी मृतांच्या वारसांना ऑनलाईन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. मृत्यांच्या वारसांना खात्यात अजूनही रक्कम जमा झालेली नाही. संबंधित अधिकारी कॉम्प्युटर बंद आहेत व कागदपत्र अपूर्ण आहेत, अशी उलट सुलट उत्तरे देतात. कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना खात्यात प्रत्येकी रक्कम ५० हजार रुपये पंधरा दिवसाचे आत जमा न झाल्यास सर्व संबंधित नातेवाईकांना घेवून तहसिलदार कार्यालयात बसेन असा इशारा मुकादम यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular