26.1 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraएनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी आयआरएस अधिकारी अमित घावटे वर्णी

एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी आयआरएस अधिकारी अमित घावटे वर्णी

एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून या संबंधित पत्रक जारी करण्यात आले असून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी समीर वानखेडे यांच्या जागी नवी नियुक्ती झाली आहे. २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे एनसीबीच्या मुंबई विभागाचे नवे संचालक म्हणून रुजू झाले आहेत. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मुंबई एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडलं होते.

एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयातून या संबंधित पत्रक जारी करण्यात आले असून याबाबत माहिती देण्यात आली आहे. तीन अधिकाऱ्यांच्या निवडीचं हे पत्र आहे. यात अमित घावटे यांची झोनल डायरेक्टर बंगळुरु आणि चेन्नईमधून मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. त्यांच्याकडे बंगळुरु झोनल युनिटचा अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी देखील असणार आहे. घावटे यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये अमनजितसिंह यांची चंदीगढ एनसीबी झोनल डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे तर ग्यानेंद्रकुमार सिंह यांची झोनल डायरेक्टर दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अमित घावटे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे आहेत.  अमित घावटेंचे वडील फक्कडसिंह घावटे हे शिरूरमध्ये डॉक्टर असून त्यांचं शिरुरमधे क्लिनिक होते. तर अमित घावटेंच्या आई सुमन घावटे या शिरुर विकास आघाडीकडून शिरुर नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून देखील निवडून आल्या होत्या.

अमित घावटेंचं चौथीपर्यंत शिक्षण शिरुर नगरपरिषदेच्या शाळेत झालं असून पाचवी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण शिरुर मधील विद्याधाम प्रशालेत झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातुन आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली. मात्र पदवीनंतर ते स्पर्धा परीक्षेची तयारी करु लागले आणि २००८ ला ते युपीएससी मार्फत भारतीय महसूल विभाग अर्थात आयआरएसमध्ये दाखल झाले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासाशी संबंधित एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन आर्यन खान प्रकरणामुळे करण्यात आले नसल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular