27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeIndiaकोरोनाच्या धास्तीमुळे स्वसंरक्षणासाठी पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर

कोरोनाच्या धास्तीमुळे स्वसंरक्षणासाठी पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर

संक्रमित रुग्ण जरी मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी, पॉझिटिव्हीटी रेट मात्र ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

मागील दोन ते अडीच वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे राज्यासह देशाची अवस्था एकदम डबघाईला गेली होती. त्यातून आता कोरोनाचे संक्रमण कमी झाले असून, राज्याची निर्बंधातून देखील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोकळीक करण्यात आली. कोरोनाच्या सुरुवातीपासूनचं केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील संक्रमितांची संख्या धडकी भरवणारी होती. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी लस उपलब्ध नसल्याने, त्यावेळी मृत्यूचे प्रमाण देखील जास्त होते.

देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून य़ा राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

दिल्ली आणि आजुबाजूच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेंशन वाढविले आहे. संक्रमित रुग्ण जरी मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी, पॉझिटिव्हीटी रेट मात्र ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा स्वसंरक्षणासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर जराशी देखील काळजी घेण्यात चूक झाली तर, त्याची मोठी शिक्षा भोगावी लागेल. आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांमधील एका टीममधील खेळाडू देखील कोरोना संक्रमित असल्याचे अहवाल समोर आल्यामुळे पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेच संकट जाणवू लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular