31.5 C
Ratnagiri
Sunday, January 19, 2025

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय ग्राहकहिताविरोधी – मोहन शर्मा

राज्यात स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा घेतलेला निर्णय हा...

ठाकरे गटातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक…

रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे....

मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही....
HomeRatnagiriलांजा येथे एटीएम मशीनमध्ये भरल्या ५०० च्या बनावट नोटा

लांजा येथे एटीएम मशीनमध्ये भरल्या ५०० च्या बनावट नोटा

अशा ५१ नोटा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली.

पंचवीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात लांजा शहरातील एका किराणा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची वरेंद्र प्रदीप सुर्वे (३९, रा. फ्लॅट नंबर ३२, सातवा माळा, बिल्डिंग एम १, को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कशिश पार्क ठाणे) यांनी याबाबतची लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. लांजा येथील किराणा व्यावसायिक संशयित पराग चंद्रकांत राणे (वय ३२, लांजा खावडकरवाडी) याने १५ जूनला सकाळी ९.०२ ते ९.०६ या कालावधीत लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ५१ अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली होती.

अशा प्रकारच्या बनावट नोटा असल्याची जाणीव असतानाही त्या स्वतःकडे बाळगून आणि बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये नोटांचा नकली वापर केला म्हणून त्याच्या विरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १६ आणि १७ अशा दोन दिवस बँकेला त्यांच्या कामकाजाला सुट्टी असल्याने मंगळवारी १८ जूनला लांजा पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular