26.6 C
Ratnagiri
Monday, November 4, 2024

OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह लॉन्च …

चीनी टेक कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप...

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात...
HomeRatnagiriआदेश धुडकावून पर्यटक बेर्डेवाडी धबधब्यावर

आदेश धुडकावून पर्यटक बेर्डेवाडी धबधब्यावर

रविवारसारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता यांच्याकडून वेरवली-बेर्डेवाडी धरण प्रकल्प आणि धबधब्याकडे जाण्यासाठी २५ मे रोजीच मनाई आदेश आणि बंदी घालण्यात आलेली आहे. असे असले तरीही हा आदेश धुडकावून अनेकजण या धबधब्याकडे जातात. तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या राजापूर तालुक्यातील कळसवली येथील २६ वर्षीय तरुणाचा दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत बेर्डेवाडी धरण प्रकल्प कार्यकारी अभियंता वैभव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा धरण प्रकल्प आणि धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना यापूर्वीच मज्जाव करण्यात आलेला आहे.

प्रकल्पाकडे जाणारा रस्ता देखील बंद केला आहे. धरणाकडे जाणारे दोन्ही गेट बंद केली असून, त्या ठिकाणी धरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्याच्या सूचनावजा फलक ठिकठिकाणी लावलेले आहेत. त्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत. याबाबत २५ मे रोजी लांजा तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तशी कार्यवाही केलेली आहे; मात्र तरीही अनेकजण हे आदेश धुडकावून या धबधब्याकडे जात आहेत. त्यातून रविवारसारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular