26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriड्रेझिंगमुळेच जयगड किल्ल्याच्या बुरुजांना तडे

ड्रेझिंगमुळेच जयगड किल्ल्याच्या बुरुजांना तडे

किल्ल्याच्या २०० म ीटर अंतरावर यंत्राच्या सहाय्याने काम गेले ६ महिने सुरू आहे.

जयगड येथील जेएसडब्ल्यूच्या नवीन जेटीसाठी पुरातन जयगड किल्ल्याच्या बुरुजाशेजारी ड्रेझींग आणि ड्रिलींगचे काम जोरात सुरू आहे. याच्या तीव्रतेने बुरूजांना धक्के बसत असल्याने किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनंतर तहसिलदारांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनीही ड्रेझिंगचे काम सुरू झाल्यापासूनच बुरुजाला तडे गेल्याचे मान्य केले आहे. पुरातत्व विभागाने यासंदर्भात आता जेएसडब्ल्यूला नोटीस देणार असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनुसार, याठिकाणी पाहणीसाठी गेलेल्या तहसिलदारांनी दिवसभर याठिकाणी सुरू असलेल्या कामाची तसेच किल्ल्याचीही पाहणी केली.

यानंतर त्यांनी याठिकाणी पंचनामाही केला. हा पंचनामा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. पंचनाम्यात म्हटल्याप्रमाणे किल्ल्याच्या २०० म ीटर अंतरावर यंत्राच्या सहाय्याने ड्रेझिंग आणि ड्रिलींगचे काम गेले ६ महिने सुरू आहे. हे काम सुरू झाल्यापासूनच बुरुजाला तडे गेले आहेत. किल्ल्याची देखभाल करणारे कर्मचारी आणि पाहणीसाठी गेलेले अधिकारी आणि ग्रामस्थांच्या समक्ष ही पंचयादी तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूस खाडीकडे अनधिकृत उत्खनन करून भराव टाकून बांधकाम केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून भरतीच्या लाटा तटबंदीवर आदळत आहेत.

यामुळे बुरूज ढासळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तहसिलदारांनीही आपल्या पंचयादीत हीच वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. हे काम सुरू राहिल्यास किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे सांगत कंपनीने ड्रेझिंगचे काम तत्काळ बंद करावे, असे तहसिलदारांनी नमूद केले आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाने लक्ष घालून बुरूजाची दुरुस्ती होईपर्यंत काम बंद ठेवावे, असेही यात म्हटले आहे. दरम्यान, आता जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग कोणती कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे तसेच दुर्गप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी राज दिवेकर यांनी आपण जेएसडब्ल्यूला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular