30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeChiplunआम.भास्करावांना भाजपने घेरले तरीही ठाकरे गट शांत कसा?

आम.भास्करावांना भाजपने घेरले तरीही ठाकरे गट शांत कसा?

आम. जाधवांना वाऱ्यावर सोडले की काय.? अशी उघड चर्चा आता नाक्यानाक्यावर ऐकण्यास मिळत आहे.

शुक्रवारी झालेल्या राड्यानंतर आता भाजपने शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडून अद्यापही वरिष्ठ नेता बोलण्यास तयार नाही. खा. विनायक राऊत बोलले, आदित्य ठाकरे अथवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची देखील कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे पक्षाने आम. जाधवांना वाऱ्यावर सोडले की काय.? अशी उघड चर्चा आता चिपळूणच्या नाक्यानाक्यावर ऐकण्यास मिळत आहे. शुक्रवारी चिपळूणमध्ये अचानकपणे राजकीय राडा झाला. राणे विरुद्ध भास्कर जाधव हा धुमसत असलेला वाद उफाळून आला आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. तुफान दगडफेक झाली.

इतकेच नव्हे तर गाड्यावर हल्ले देखील चढवण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्ते आणि पोलीस व पत्रकार देखील जखमी झाले. पोलिसांनी सुमारे ४०० लोकांवर गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आणि अद्यापपर्यंत आम. भास्करराव जाधव समर्थक असलेल्या १२ लोकांना अटक देखील केली. आताही पोलिसांची, शोधमोहीम सुरूच आहे. परंतु राणे समर्थक किंवा भाजपच्या एकही कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. असे असले तरी भाजपने मात्र पुढाकार घेऊन आपल्या कार्यकत्र्यांचे उघडपणे समर्थन करण्यास सुरुवात केली आहे.

गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, त्यानंतर माजी आमदार विनय नातू, तसेच जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी या सर्व प्रकरणात उघडपणे प्रतिक्रिया देत असताना आमदार भास्कर जाधव तसेच शिवसेना ठाकरे गटाला अर्थात शिवसैनिकांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न केले आहे. प्रत्यक्षात भास्कर जाधव सिंधुदुर्गात जे बोलले होते ते थेट पक्षाच्या व्यासपीठावरून पक्षप्रमुखांच्या समोर बोलले होते. परंतु त्याला उत्तर देण्यासाठी निलेश राणे यांनी आम. जाधवांच्या मतदारसंघात सभा घेऊन त्याला पक्षीय सभेचे स्वरूप दिले असले तरी भाजपने मात्र हा पक्षाचाच विषय असे धोरण ठरवून निलेश राणे व कार्यकर्त्यांच्या पाठी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. तशी दिखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपने अत्यंत पद्धतशीर या – प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आम. जाधवांना चारही बाजूने आता घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण आश्चर्य आहे की शिवसेना ठाकरे गट अद्याप शांत आहे. येथील जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे आणि क्षेत्रप्रमुख बाळा कदम हे ३ पदाधिकारी ‘ वगळता ठाकरे गटातील अन्य कोणीही या संदर्भात आपली भूमिका मांडण्यास पुढे आलेला नाही. कार्यकर्त्यांची थेट धरपकड सुरू असताना देखील स्थानिक पदाधिकारी शांत कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ नेते गप्प कसे – आमदार जाधव हे पक्षाचे नेते आहेत. पक्षासाठी त्यांनी विरोधकांना थेट अंगावर घेण्याचे काम केले आहे. विधानसभा असुदे किंवा जाहीर सभा किंवा थेट रस्त्यावरची लढाई असुदे, भास्करराव थेट भिडताना दिसत आहेत. परंतु चिपळूणमध्ये इतकी मोठी घटना घडली असताना आणि भाजपने त्यांना घेरले असताना वरिष्ठ नेते अवाक्षरही काढत नाहीत याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे

RELATED ARTICLES

Most Popular