26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriदमदाटीने वसुली करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - मंत्री उदय सामंत

दमदाटीने वसुली करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार – मंत्री उदय सामंत

रत्नागिरीत १६ मायक्रो फायनान्स कंपन्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

मायक्रो फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जापोटीच्या हप्त्यांची वसुली जोर जबरदस्तीने केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रत्नागिरीत १६ मायक्रो फायनान्स कंपन्या असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी वसुलीसाठी महिलांना दमदाटी केली किंवा रात्री-अपरात्री घरी जाऊन हप्ते वसुलासाठी तगादा लावला तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्या. याप्रसंगी रत्नागिरीतील महिला बचत गटांना दिलासा देणारा निर्णय पालकमंत्री सामंत यांनी घेतला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, रत्नागिरीतील काही महिला बचत गटांनी विविध कामांसाठी २० हजार रुपयांपासून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले होते.

या कंपन्या कमी कागदपत्राद्वारे कर्ज देत असल्यामुळे महिला त्याकडे आकर्षित होतात. त्यांच्याकडून पैसेही तातडीने मिळतात. मात्र हप्ते वसूल करण्याची त्यांची पद्धत बँकेपेक्षा वेगळी आहे. त्यांचे हप्ते थकले तर ग्राहकांला धमकावून, दमदाटी करून कधी घरातील वस्तू उचलून आणून पैशांची वसूली केली जाते. त्यासाठी संबंधित कंपनीचे वसुली अधिकारी केव्हाही महिलांच्या घरी जातात. त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेच्या नियमाला धरून फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीतच संबंधितांच्या घरी जावे असा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी ३३ टक्के व्याजदराने पैसे वसूल केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. या प्रकारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक होणार असून त्यामध्ये कर्जात सूट देऊन एकाचवेळी पैसे भरण्याविषयी निर्णय घेतले जातील.

शंभर दिवस’चे काम समाधानकारक – शंभर दिवस उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कार्यालयांकडून चांगले काम केले गेले आहे. रत्नागिरीतील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सुखकारक जीवन या घोषवाक्याला धरून सुविधा देण्यात येणार आहेत. विविध गोष्टींसाठी येणाऱ्या व्यक्तीला तिथे आल्यानंतर समाधानकारक न्याय मिळेल अशी योजना आहे. तसेच उद्योग विभागाला दिलेल्या २२ पैकी १६ योजना शंभर टक्के पूर्ण झालेल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत १३५ टक्के काम झाले आहे, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.

त्या’ कामगारांना बाजूला करणार – मुंबई महापालिका आणि रत्नागिरी नगरपालिका एकाच कॅटेगिरीत आल्यामुळे विविध कामांसाठीच्या मक्त्यांवरील कामगारांचे वेतन ३२ हजार रुपयांपर्यंत गेले होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असून रत्नागिरी पालिका अ वर्गात घेतली जाणार आहे. तसेच तारांगण, प्रमोद महाजन क्रीडांगण, उद्यानामध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक कामगार नियुक्त केले गेले आहेत. त्याची माहिती घेऊन अनावश्यक कामगारांची कपात केली जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular