27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtra१५ लाख देतो म्हणणार १५०० वर आले पुढे १५ रुपयांवर येतीलः आदित्य ठाकरे

१५ लाख देतो म्हणणार १५०० वर आले पुढे १५ रुपयांवर येतीलः आदित्य ठाकरे

एका वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

महाराष्ट्राचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहे. महाराष्ट्राने लोकसभेत स्पष्ट निकाल दिलाय. काय करायचं हे मतदाराला माहिती असतं. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे आमचे मतदार आहेत. सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभा देखील जिंकू,  असे ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजप आणि शिंदेगटावर टिका करताना, सुरुवातील १५ लाख देणार बोलणारे आता १५०० वर आले आहेत. काही दिवसांनी १५ रुपये देण्यावर येतील, असा टोला त्यांनी लगावला. एका वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

या राज्याला गेल्या काही वर्षात मागे खेचलं गेलंय. राजकीय स्थैर्य आल्यावर इंडस्ट्री येतील, जातीय सलोख येईल, शेतकऱ्यांना फायदा होईल पण यासाठी राजकीय सलोखा असणे आवश्यक आहे. जी काम सुरु होती ती थांबवण्याचा प्रयत्न केल्याची टीका फडणवीसांनी केली होती. यावर आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली. खोटं बोलण्यात फडणवीस खूप पुढे गेले आहेत. मेट्रो ३ च्या कामाला आम्ही थांबवलं नाही तर चालना दिली. पण आरे कारशेडचं काम थांबवलं आणि कांजुरमार्गला नेलं. आरे कारशेडचं काम ६ महिन्यांच होतं. आम्ही कोविड काळातही मेट्रोचे काम थांबवले नव्हते. आता मेट्रो कामात भ्रष्टाचार झालाय, अशी टीका त्यांनी केली.

जून २०२२ पासून जानेवारी २०२४ पर्यंत राहिलेल्या कामाला त्यांना २ वर्षे लागली. कोस्टल रोड पार्ट पार्टमध्ये सुरु झालाय. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था पाहा. मुंबई-गोवा मुंबई- दिल्ली हायवे यांची दुर्दशा आहे. तरी गडकरी म्हणत असतात इतक्या कमी कालावधीत रस्ता केला. प्रत्येक अधिकाऱ्याने यातून पैसा काढल्याचे ते म्हणाले. लोकांच्या मनात फरत स्पष्ट आहे. काही ठिकाणी चिन्हामुळे थोडी गडबड झाली. पण महाराष्ट्राचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आहे. महाराष्ट्राने स्पष्ट निकाल दिला आहे.

कोणत्याही देशाच्या कोणत्याही नागरिकाने मला मत दिलं तर भाजपच्या पोटात का दुखतं ? कोणाच्या माथ्यावर लिहिलेलं नसतं की तो कोणता मतदार आहे. बांगलादेशमध्ये हिंदुवर अत्याचार होतायत आणि वाद विवाद भारतात होतायत. त्याच बांगलादेशसोबत यांची बीसीसीआय त्यांच्यासोबत क्रिकेट खेळतेय. हीच गोष्ट काँग्रेसने केली असती तर भाजप आज रस्त्यावर उतरली असती. हिंदु, मुस्लिम, शीख, ईसाई, कोणीही आम्हाला मत देतील. ते भारतीय म्हणून मत देतील, असे ते म्हणाले. आज मुंबईत साऱ्या धर्माची एकजूट सरकारला तोडायची आहे.

धारावी आज लढतेय ती अदानींविरोधात लढतेय. धारावी आपल्या न्यायासाठी लढतेय. तिथे कोणता धर्म नाही. ही लढाई कमजोर करण्यासाठी सारे खेळ चालले आहेत. आपल्या देशाचा जो नागिरक असेल त्याला निवारा द्या, अन्न द्या हे आपलं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व नकली आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपकडून आली आहे. संविधानाप्रती त्यांचा द्वेश जाहीर आहे. हे नॅरेटीव्ह नव्हते. अच्छे दिन सारखी टॅग लाईन नाही. महाराष्ट्रात लोकशाही संपतेय. आमदार पळवून नेले. संविधानाने चालले असते तर आमदार बाद झाले असते. आमच्याबद्दल तुमच्या मनात राग असणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंना संपवा असं म्हणतात, हा राग तुमच्याकडे कुठून आला? असा प्रश्न त्यांनी विचारला

RELATED ARTICLES

Most Popular