25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeKhedमहाविकास आघाडीच्या भास्कर जाधवांना गुहागरात महायुतीकडून आव्हान कोणाचे?

महाविकास आघाडीच्या भास्कर जाधवांना गुहागरात महायुतीकडून आव्हान कोणाचे?

चिपळून विधानसभा मतदारसंघातून १९९५ व १९९९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले.

भास्कर जाधव यांची गुहागर विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. महाविकास आघाडीत गुहागरची जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असून भास्कर जाधव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना २७५९६ चे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार भास्कर जाधव यांची चांगली पकड आहे. त्यांना महायुतीकडून आता कोण आव्हान देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

२०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. शिवसेना ठाकरे गटातील आक्रमक नेत्यांपैकी एक भास्कर जाधव आहेत. भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. चिपळून विधानसभा मतदारसंघातून १९९५ व १९९९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४ मध्ये शिवसेनेकडून भास्कर जाधव यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यावेळी नाराज झालेल्या जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली व २००४ मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. शिवसेना सोडल्यानंतर भास्कर जाधव यांनी वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून ते सलग दोन वेळा म्हणजेच २००९ व २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर निवडून गेले.

२०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत जाधव यांचे संबंध ताणले जात होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत घरवापसी केल्याचे म्हटले जाते. सध्या भास्कर जाधव हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असून ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अंनंत गिते यांना ७४६२६ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गुहागरमधून ४७०३० मते मिळाली. अनंत गितेंना २७५९६ मते अधिक मिळाली. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार भास्कर जाधव यांची चांगली पकड आहे.

RELATED ARTICLES

Most Popular