30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeRajapurराजापुरात गंगास्नानाला ७० हजार भाविकांची गर्दी

राजापुरात गंगास्नानाला ७० हजार भाविकांची गर्दी

आठवड्याभरात सुमारे दीड लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे.

शिमगोत्सवाच्या धामधुमीत उन्हाळे गावी गंगामाईचे आगमन झाले आणि भक्तांची गर्दी सुरू झाली. गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. सहा दिवसांत सुमारे सत्तर हजार भाविकांनी गंगा स्नानाचा आनंद घेतला. या ठिकाणी स्थानिकांसह परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विविध प्रकारची दुकाने थाटली असून त्यामधून आठवड्याभरात सुमारे दीड लाखाहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते आणि तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते. मात्र अलीकडे गंगेचे आगमन व निर्गमन या प्रक्रियेला छेद दिल्यासारखे आहे.

काही वर्षे तर गंगा सलग आली होती. तसेच तिच्या वास्तव्याचा कालावधीही लांबला होता. पूर्वी तीन वर्षांनंतर प्रकट होणाऱ्या गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे गंगा आगमनाच्या काळात गंगाक्षेत्राचा परिसर भाविकांनी फुलून जात असे. या परिसरात विविध दुकाने, हॉटेल्सच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढालही होत होती. मात्र गंगेचे आगमन सातत्याने होत असल्यामुळे पूर्वीचा भाविकांचा ओढा कमी होत आहे. तीन वर्षांपूर्वी ३० एप्रिल २०२१ रोजी गंगामाईचे आगमन झाले. मार्च २०२२ पासून गंगामाईचा प्रवाहही कमी झालेला होता. गायमुखातून वाहणारे पाणी बंद झाले होते. मात्र गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली आहेत.

जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर १५ मे २०२२ पासून पुन्हा गंगामाईचा प्रवाह वाढला व गायमुखही प्रवाहित झाले. तेव्हापासून गंगामाईचा प्रवाह अखंडितपणे सुरू होता. डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा गायमुखातून वाहणारा प्रवाह बंद झाला. त्यानंतर आता गेल्या आठवड्यामध्ये पुन्हा गायमुख प्रवाहित झाले असून मुळ गंगेसह सर्व कुंड पाण्याने भरलेली आहेत. सध्या तालुक्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. या कालावधीत गंगामाईचे आगमन झाल्यामुळे गंगाक्षेत्री चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. काही दिवसांमध्ये सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे गंगाक्षेत्री भाविकांची गर्दी वाढेल. त्याचा लाभ व्यापाऱ्यांना होत असून अनेकांनी दुकाने थाटली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular