27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriभावनिक आवाहनाला बळी पडू नका - मंत्री रवींद्र चव्हाण

भावनिक आवाहनाला बळी पडू नका – मंत्री रवींद्र चव्हाण

भावनिक आवाहन करणाऱ्यांनी कोकणासाठी काय केले, केंद्राच्या मदतीने काय मिळवून दिले, ते जनतेला सांगावे.

भावनिक आवाहन करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम करणाऱ्या विरोधकांनी केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून १० वर्षांमध्ये कोकणाला काय मिळवून दिले ते सांगावे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सर्व घटकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासह देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. नरेंद्र मोदी हे एक मॅजिक असून, मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राहिलेल्या ३५ दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत करून घराघरांत जाऊन मोदी यांचे कार्य पटवून द्यायचे आहे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

सावरकर नाट्यगृहात आयोजित बूथ कार्यकर्ता सुपर वॉरिअर्स संमेलनात ते बोलत होते.  या वेळी आमदार नीतेश राणे, लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, “लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार “निवडून देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. आपल्या भागांमध्ये, नावामध्ये, वस्तीत, शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि परिवारापर्यंत पोहोचण्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. विरोधकांच्या भावनिक आवाहनाला कोणी बळी पडू नका.

भावनिक आवाहन करणाऱ्यांनी कोकणासाठी काय केले, केंद्राच्या मदतीने काय मिळवून दिले, ते जनतेला सांगावे.”मोदी काय आहे, हे जनतेपर्यंत गेले पाहिजे. नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये १५ वर्षे प्रचारक होते. त्या माध्यमातून देशभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर संघटनात्मक पदाधिकारी झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी मॅजिक काय आहे, हे आता विरोधकांना दाखवून द्या. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोबाईल चार्ज करावा लागतो तसे लोकांना चार्ज करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular