27.9 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriजिल्ह्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम, मुख्याधिकाऱ्यांचे काटेकोर नियोजन

जिल्ह्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम, मुख्याधिकाऱ्यांचे काटेकोर नियोजन

जिल्ह्यातील गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहिमेत नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात गोवर आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर हा आजार समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यातील गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहिमेत नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरापासून लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या स्थानिक आशा आणि आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत तयार करण्यात येणार आहेत. २६ जानेवारी २०२३ पर्यंत या बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चार आठवड्याच्या अंतराने दोन मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष लसीकरण सत्राचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठकही नुकतीच झाली. त्यानुसार १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी २०२३ दोन टप्प्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ९२३ लाभार्थींना लस दिली जाणार आहे.

या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले कि, साथीच्या पार्श्वभूमीवर आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येऊन नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी मोहिमेसाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. लसीकरणापासून वंचित बालकांच्या पालकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सीईओ पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular