28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeDapoliदापोलीत परप्रांतीय भंगार व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, २० जणांवर गुन्हा दाखल

दापोलीत परप्रांतीय भंगार व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, २० जणांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून देगाव येथे वीस पेक्षा अधिक जणांच्या जमावाने परप्रांतीय भंगारवाल्यांच्या वाड्यावर हल्ला केला

दापोली तालुक्यातील देगाव येथील बौद्धवाडी येथे रहाणारे परप्रांतीय भंगार व्यावसायिक गंगाराम शुक्ला यांना वीस नागरिकांच्या जमावाने मारहाण करून घरातील सामानाची नासधुस केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. मालकासह भाडेकरुला सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली.

दापोली पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवार दि.०९ एप्रिल रोजी दुपारी दोन च्या दरम्यान मालक मंडपे यांनी शुक्ला यांना फोन करून सांगितले कि, गावातील काही लोक तुमच्या घराची मोडतोड करत आहेत. हे ऐकल्यावर ते पत्नीसह घराचे काम सुरु असलेल्या जागी धाव घेतली. जमिनीच्या वादातून देगाव येथे वीस पेक्षा अधिक जणांच्या जमावाने परप्रांतीय भंगारवाल्यांच्या वाड्यावर हल्ला केला आणि प्रचंड नुकसान केले. शुक्ला यांना देखील लाथाबुक्य्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्नीसह तिथून पळ काढला. आणि जीव वाचविण्यासाठी लपून बसले.

तर बाहेर उभी असलेली टाटा एक्सल गाडीची काच फोडून ती उलटवून टाकण्यात आली. तसेच घर बांधणीसाठी आणलेल्या तीन पाण्याच्या टाक्या देखील फोडून टाकण्यात आल्या. शुक्ला हे या प्रकाराने भयभीत झाल्याने जीव वाचवण्याच्या उद्देशाने मुकुंद सिताराम मंडपे यांच्या माळ्यावर लपून बसले. हे या जमावाला समजल्यावर या जमावाने मंडपे यांच्या घरात शिरून त्यानाही मारहाण केली. मंडपे यांच्या कडून त्यांनी १२ गुंठे जागा विकत घेतली आणि त्यावर आता घर बांधण्याचे काम सुरु होते. याप्रसंगी शुक्ला यांचे वाड्यातील धान्य व इतर सामानाची नासधुस करून काही सामान शेजारील शेतात डिझेल टाकून देऊन पेटविण्यात आले. हल्लेखोर निघून गेल्यावर प्रथम त्यांनी पोलीस स्थानकांत जाऊन तक्रार नोंदवली.

RELATED ARTICLES

Most Popular