27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...

आंबा घाटात झालेल्या ट्रक अपघातात, महिला जागीच ठार

रत्नागिरीला जोडणाऱ्या महामार्गांवर एक दिवस आड अपघातांची...
HomeDapoliदापोलीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याच्या आत्महत्येने, परिसरात एकच खळबळ

दापोलीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याच्या आत्महत्येने, परिसरात एकच खळबळ

अनिल रिसबूड अनेक दिवस विविध शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. मात्र, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

जिल्ह्यातील दापोली शहराजवळील गिम्हवणे येथील एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान आपली पत्नी कामानिमित्त बाहेर गेली असताना त्या घरी आल्यावर त्यांना ते घरात दिसले नाहीत. तेव्हा त्या शोधाशोध करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. घराच्या परिसरातील जुन्या वर्कशॉपच्या खोलीमध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांनी पाहिले व मोठा धक्का बसला. या ६७ वर्षीय जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचे अनिल रिसबूड असे नाव आहे.

स्वाभिमानी असलेले रिसबूड हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरात सुपरिचीत होते. अनिल रिसबूड अनेक दिवस विविध शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. मात्र, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. गावच्या ग्राम सभांमधूनही त्यांचा सक्रिय सहभाग असे. एक प्रकारे अभ्यासू वृत्तीचे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांनी उचलेल हे धक्कादायक पाऊल अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. आपल्या फर्निचर व्यवसायातून अनेक नवयुवकांना त्यांनी घडवण्याचे सत्कार्य केले होते. त्यांच्या अशा आकस्मित जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाहेरून आल्यावर रिसबूड यांच्या पत्नीने त्यांचा शोध घेतला असता, समोर दिसलेल्या दृष्यची तत्काळ शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळवण्यात आले. या घटनेचे वृत्त कळताच रिसबुड यांचे जवळचे स्नेही असलेले दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जागावकर, संचालक अन्वर रखांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली व कुटुंबीयाना धीर दिला. अनिल रिसबूड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आई आणि पुणेस्थित विवाहित कन्या, जावई असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular