27.7 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriभविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी, जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे

भविष्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी, जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे

जलसंधारण योजनेतून जिल्ह्यात ७५ वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे पक्के बंधारे असतील.

यंदा सर्वत्रच पावसाने उशिरा म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पण दमदार सुरुवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही. त्यानंतर काही दिवसांनी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भविष्यात लवकर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून जलसंधारण म्हणून जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टला त्याचा मुहूर्त केला जाणार असून यंदाच्या डिसेंबरपर्यंत ते पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १ हजार १८१ योजना होत्या; परंतु २०२२-२३ मध्ये त्या १ हजार ४७५ योजनांचा ८२० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ८७९ योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. २८८ योजनांवर काम लवकरच सुरू होईल तर ३३ योजनांची कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा पण चांगली सुरवात केली. त्यानंतर मात्र गतवर्षीची सरासरी अजून गाठलेली नाही.

जलसंधारण योजनेतून जिल्ह्यात ७५ वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे पक्के बंधारे असतील. त्यांना पाणी सोडण्यासाठी व साठवण्यासाठी लोखंडी झडपा बसवण्यात येणार आहेत. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला लवकर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची भिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पाणीसाठा करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ७५ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. जलसंधारण म्हणून जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे बांधले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याच्या तुटवड्याची समस्या भविष्यात राहणार नाही असा अंदाज मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नी वर्तवला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular