27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriहळद संशोधन समितीवर डॉ.माळी यांची नियुक्ती

हळद संशोधन समितीवर डॉ.माळी यांची नियुक्ती

दापोली येथील डॉ. कोकण कृषी विद्यापीठातील जेष्ठ प्राध्यापक संशोधक प्रा.डॉ. प्रफुल्ल माळी यांची शासनाच्या हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण निश्चित करण्याच्या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. माली हे मुळत: चिपळूणचे रहिवासी असून गेली बरीच वर्षे ते दापोली गिम्हवणे येथे वास्तव्यास आहेत. मसाला पिक योजनेमध्ये आल आणि हळद पिकाचे लागवड करून उत्पन्न घेण्याचे त्यांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावर त्यांनी अभ्यास करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसे उत्पन्न घेता येईल याचे संशोधन केले होते आणि त्याचा फायदा अनेक शेतकर्यांनीही करून घेतला.

भारत आणि हळद शेती लागवड याबाबतीत थोडी माहिती पाहूया. भात शेतीनंतर पर्याय म्हणून हळदीचे उत्पादन घेणे फायदेशीर ठरू शकते. हळदीच्या अंगी असलेले अनेक उपयुक्त गुणधर्म पाहता, त्यांची देशासह परदेशामध्येही मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे हळदीचे उत्पन्न घेऊन त्याला व्यावसायिक स्वरूप दिले असता नक्कीच भरभराट होऊ शकते. कोकणातील वातावरण पाहिले असता तिथे कोणतेही उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकते गरज आहे ती फक्त काही ठराविक काळजी घेण्याची आणि हळदी पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ करण्यास महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे. म्हणून भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतामधील सुद्धा वातावरण अनुकूल असल्याने हळदीची लागवड करणे सहज शक्य होऊ शकते. त्यासाठी फक्त येणारे उत्पन्न, मागणी, आवश्यक वाण, खते, बाजारपेठ, हळदीच्या दरामध्ये जाणवणारा चढउतार, ती काढण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा अवलंब करणे इत्यादी सर्व बाबी लक्षात घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

उद्यानविद्या अधीक्षक या पदावर अत्यान अभ्यासू आणि कार्यशील प्राध्यापक डॉ. माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular