25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriडम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करा

डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करा

दररोजचा कचरा कसा आणि कोठे त्याचा निचरा करायचा याबाबत रोज अनेक प्रश्न निर्माण होत असतात. दररोजच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प निर्माण केला. शहरापासून लांब असलेल्या मोकळ्या जागेवर दररोजचा कचरा नेऊन तो जाळून टाकून त्यांची वेळीच विल्हेवाट लावली जाते. पण या रोजच्या कचर्यामध्ये सुद्धा ओला कचरा, सुखा कचरा , इतर वस्तू यांचे विभाजन करणे गरजेचे आहे.

रत्नागिरी मधील लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी येथे शासन ग्रामस्थांचा विरोध असूनही डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प उभारत असल्याने शासना विरोधात सर्व ग्रामस्थ एकवटले असून या प्रकल्पाचा निषेध करत आहेत. ग्रामस्थांनी या संदर्भात अनेक अधिकाऱ्याना पत्र व्यवहार केले असून शासनाकडून प्रकल्प तिथेच राबविण्यात येणार असल्याबाबत निर्णय ठाम असल्याचे लक्षात येते आहे.

एरव्ही सरकारी काम आणि आठवडाभर थांब अशी कोणत्याही शासकीय कामासाठी म्हण वापरली जाते परंतु कोत्रेवाडीतील ग्रामस्थांना एक नवीनच अनुभव आला. अचानकपणे लांजा नगराध्यक्ष, काही नगरसेवक आणि अधिकारी यांनी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प जागेची मोजणी करण्यासाठी आले असता, एरेव्ही १०-१२ गुंठे मोजणी करायची असल्यास कर्मचारी आणि अधिकारी अख्खा दिवस घालवतात आणि या प्रकल्पासाठी मात्र १० एकर जागेची मोजणी एका दिवसात आश्चर्यकारक रित्या करण्यात आली. आलेल्या अधिकाऱ्यांसमोर सुद्धा ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. या प्रकल्पाच्या जवळ वाडीवस्ती, घरे,पाण्याचे विविध स्त्रोत असल्याने हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प इथे झाल्याने भविष्यात आम्हाला अनेक गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आणि जर हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्याच्या आमच्या मागणीबाबत गंभीर विचार केला गेला नाही तर नगरपंचायती समोर उपोषण छेडण्यात येईल, प्रसंगी आत्मदहनाचा इशारा सुद्धा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular