26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeChiplunचिपळुणात अतिक्रमण काढण्यासाठी दिवसाची मुदत

चिपळुणात अतिक्रमण काढण्यासाठी दिवसाची मुदत

गटारात प्लास्टिक बॉटल्स, मातीसह अन्य कचरा अडकल्यानंतर ते स्वच्छ करता येत नाही.

चिपळूण पालिकेने बाजारपेठेतील गटारांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आज व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्याची सूचना केली. गुरुवारी गटारांवर अतिक्रमण दिसले तर पालिका जप्त करेल, असा इशारा त्यांना देण्यात आला. गटारांवरील कडप्पे, बांधकामे काढण्याची सूचना केली आहे. चिपळूण पालिकेकडून मॉन्सूनपूर्व कामांची लगबग सुरू आहे. शहरातील नाले, पन्हे, गटारांची साफसफाई केली जात आहे. शहरातील बाजारपेठेत रस्त्याला लागून गटार आहेत.

दुकानदार, व्यावसायिकांनी या गटारांवर कडप्पे, लेंटर तर काही ठिकाणी बांधकामे करून ती गटारे झाकली आहेत. त्यामुळे पालिकेतील सफाई कामगारांना या गटारांची साफसफाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. गटारात प्लास्टिक बॉटल्स, मातीसह अन्य कचरा अडकल्यानंतर ते स्वच्छ करता येत नाही. पावसाळ्यात गटारातील पाणी रस्त्यावर व दुकानांमध्ये शिरण्याची शक्यता जास्त आहे. तुंबलेल्या गटारामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. या गटारांची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी व्यापारी केली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी आज शहरात फेरफटका मारला आणि गटारांवरील कडप्पे यांच्यासह कच्ची व पक्की बांधकामेही तोडण्याची सूचना व्यापाऱ्यांना केला. गुरूवारी सकाळी अतिक्रमण दिसले तर पालिका ते जप्त करेल, असा इशारा देण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular