30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeRatnagiriराज ठाकरे यांनी चिमुरड्याची “ती” इच्छा त्वरित केली पूर्ण

राज ठाकरे यांनी चिमुरड्याची “ती” इच्छा त्वरित केली पूर्ण

चिमुरड्याची इच्छा ऐकताच राज ठाकरेही हेलावले. त्यांनी करण सोबत एक छान सेल्फी काढला.

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्हयात लांजा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली. राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत कोकणात येत्या काळात मनसेची वाटचाल कशी असेल, याचे स्पष्ट संकेत दिले. मनसे पक्ष बांधणीच्या आड दुसरा पक्ष आल्यास त्यांना तुडवा आणि पुढे जा, असे थेट आदेशच राज ठाकरे यांनी कोकणात काढले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन सुरेश साळवी यांचं करोनामुळे दुर्दैवी निधन झालं. कोकण दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंनी सचिन साळवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आणि साळवी कुटुंबाला आधार दिला. सचिन साळवी यांच्या लेकाची राज ठाकरेंनी मायेने विचारपूस केली. त्यांचा मुलगा करण साळवी इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. यावेळी करणने राज ठाकरें सोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. चिमुरड्याची इच्छा ऐकताच राज ठाकरेही हेलावले. त्यांनी करण सोबत एक छान सेल्फी काढला. हा सेल्फी टिपतानाचा क्षण मनसेच्या कार्यकर्त्यांनी कॅमेरात टिपला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याचे करोनामुळे निधन झाले होते. कोकण दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वनही केले. यावेळी त्यांच्या लेकाने राज ठाकरेंसोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर राज यांनीही चिमुरड्याची इच्छा क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण केली. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो, की कुणी हात लावू शकणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular