27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeEntertainmentते बाळ आहे, खेळणं नव्हे, देबिना मुलीसोबतच्या व्हिडियोमुळे झाली ट्रोल

ते बाळ आहे, खेळणं नव्हे, देबिना मुलीसोबतच्या व्हिडियोमुळे झाली ट्रोल

मुलगी इतकी लहान आहे की,  व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही तिच्या काळजीने या अभिनेत्रीची अनेकांनीच शाळा घेतली आहे.

सोशल मीडियावर सध्या एका लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्या नवजात मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्री तिच्या मुलीला कुशीत घेऊन घरामध्ये चालताना दिसत आहे. सोबतच ती गाणं गुणगुणत त्या तालावर ती डुलतानाही दिसत आहे. पण, मुलगी इतकी लहान आहे की,  व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही तिच्या काळजीने या अभिनेत्रीची अनेकांनीच शाळा घेतली आहे.

बाळाला जन्म देण म्हणजे प्रत्येक महिलेचा पुनर्जन्म असतो, असं अनेकदा म्हटलं जातं. मुळात बाळ जसजसं मोठं होत जातं, तसतसा आईचा नवा जन्म आणखी परिपक्व होताना दिसतो. पण, एका अभिनेत्रीची आईची हीच भूमिका सुरुवातीलाच काहीशी डगमगताना दिसत आहे. त्याला कारणंही तसंच आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे, देबिना बॅनर्जी. देबिना तिच्या मुलीच्या जन्माच्या आधीपासूनच तिचे व्यायाम, आहार याबद्दल सर्व माहिती देत आली आहे. नंतर तिच्या मुलीची काळजी नेमकी कशी घेतली जात आहे, यासंबंधीचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. यातच तिनं दोघींचा असा एक व्हिडीओ शेअर केला,  जो तिच्या फॉलोअर्सना मात्र पटला नाही. कारण, गाण गात आणि त्या तालावर संथपणे डुलत देबिनानं तिच्या मुलीला एका हाताने जसे पकडलं आहे, ते पूर्णत: चुकीचं असल्याचं अनेकांचं म्हणणं ठरलं.

अनेकांनी तर ते ते बाळ आहे, खेळणं नव्हे;  कळत नाही का तुला, तिला नीट पकड; तू खूप चांगली आई आहेस वगैरे सर्व ठीक, पण मुलीला तू ज्या पद्धतीनं पकडलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा शब्दांत देबिनाला फॉलोअर्स आणि नेटकरीनी सुनावले आहे. थट्टा- मस्करीच्या वेळी मस्करी पण, गंभीर प्रसंगी नको ते ट्रेंड सेट करु नकोस, असं म्हणत अनेकांनीच तिली शाळा घेतली. लहान मुलीच्या काळजीपोटी येणाऱ्या या कमेंट पाहता देबिनाच्या लेकिची सर्वांनाच किती काळजी आहे, हे सुद्धा तितकच स्पष्ट झालं.

RELATED ARTICLES

Most Popular