अॅल्युमिनियम प्रकल्पबाधीत शेतकरी संघ आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला असून गुरुवारी निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी शेकडो शेतकऱ्यांनी त्यांची जमीन दिली. हा प्रकल्प काही झाला नाही. शेतकऱ्यांची जमीन मात्र अडकून पडली आहे. अॅल्युमिनियम प्रकल्प बाधीत शेतकरी संघ ही जमीन पुन्हा शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आंदोलन करत आहेत.
गेल्याच महिन्यांत या जमिनीत शेती करत, भात लावणी करत प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांनी आपल्या म ागणीसाठी आंदोलन केले होते. गुरुवारी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे. २२ ऑगस्टला गुरुवारी सकाळी ११ वा. परंटवणे नाका येथून शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कचेरीवर धडकेल असे अॅल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.