25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeSindhudurgआ. नितेश राणेंच्या विरोधात मातोश्री कोणाला भिडवणार?

आ. नितेश राणेंच्या विरोधात मातोश्री कोणाला भिडवणार?

याची उत्सुकता शिगेला कोकणी मुलखाला लागली आहे.

कणकवली विधानसभा मतदार संघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मातोश्री कोणाला भिडवणार? याची उत्सुकता शिगेला कोकणी मुलखाला लागली आहे. अरे ला का?! बोलण्याची हिम्मत असणाऱ्या नेत्यांना मातोश्रीने अगोदरच कणकवलीच्या मतदार संघात कामाला लावले असून सध्या सर्व्हे सुरु असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. चवथीचे दिवस जवळ आलेत चाकरमानी हळुहळू गावी येऊ लागलेत. गावच्या बाजार पेठा भरू लागल्या आहेत. मागच्या वेळी मुंबईचे भाय लोकही येथील प्रचारात उतरले होते. तेव्हा एकच धमाल उडाली होती. त्या यादेने कणकवलीत आम. राणेंविरुद्ध कोणाला भिडवणार? यावरून मालवणी मुलखात जोरदार चर्चा सुरु असून उत्सुकता लागली आहे.

कणकवली- वैभववाडी-देवगड विधान सभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे हे असून ते कट्टर उद्धव ठाकरे यांचे विरोधक मानले जातात. त्यामुळे निवडणुकांना दोन महिने बाकी आहेत. ठाकरे यांनी एक वर्षा पूर्वीच आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संदेश पारकर यांच्याकडे जिल्हा प्रमुख, सतीश सावंत यांच्याकडे विधान सभा प्रमुख आणि अतुल रावराणे यांच्याकडे संपर्क प्रमुखाची जबाबदारी सोपवली आहे. हे तिघेही कट्टर राणे विरोधक मानले जातात. त्यामुळे कणकवली मतदार संघात येत्या काळात राजकीय संघर्ष पहायला मिळेल असा राजकीय निरीक्षकांचा व्होरा आहे.

कणकवली हे टार्गेट – येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नितेश राणे यांच्या विरोधात कोणाला भिडवायचे? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती मातोश्रीच्या खास सूत्रांनी दिली आहे. संघटना बांधा. एक वेळ रक्ताचे पाणी करा पण कणकवली जिंका असे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची? हा आमच्या समोर विषय नाही व तेवढा महत्वाचा नाही. आमचं टार्गेट कणकवली मतदार संघ आहे. उमदेवारी देताना निवडणूक जिंकेल हाच निकष असणार आहे. निवडणुकीला अजून दोन महिने बाकी आहत, ठाकरे गटाच्या तिघां नेत्यावर पक्ष संघटना बांधणी करण्याची जबाबदारी दिली असून सध्या सर्व्हे सुरु आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

मागच्या वेळी संधी हुकली – मागच्या वेळी कणकवली मतदार संघात विधानसभेला निवडून येण्याची संधी हुकली होती, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारणेही होती. आमचे उमेदवार सतीश सावंत हे आमच्यासाठी नवे होते. त्यांनी आयत्यावेळी म्हणजे अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे दिवशी उमेदवारीचा अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांनी नुकताच शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. त्यावेळी पक्ष बांधणी करायला वेळ मिळाला नाही. तरी सुद्धा त्यांनी उल्लेखनीय मते मिळविली. मागची चूक पुन्हा करायची नाही म्हणून मातोश्री या मतदार संघाकडे लक्ष ठेवून आहे अशी चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत व्यक्त होत आहे.

कोणाला भिडवणार? – आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोणाला भिडविणार? याची उत्कंठा मालवणी मुलखात सुरु आहे. २८८ मतदार संघापैकी कणकवली हा मतदार संघ मातोश्रीच्या अजेंडावरील अग्र स्थानावर आहे. संदेश पारकर अतुल रावराणे किंवा सतीश सावंत या तिघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल? अशी चर्चा आहे.

मागच्या निवडणुकीत भाय लोक – मागच्या निडणुकीत या मतदारं संघात प्रचारासाठी मुंबईचे भाय लोक उतरले होते. त्यावेळी वेळी म्हणे काही पुढारी घाबरले होते. आणि त्यांच्या मागून नफिरणारी अर्धशिक्षित तरुणांची फलटण म्हणे बिळात लपली होती. काही भाई लोकांना कणकवलीच्या एका हॉटेल मध्ये अटक झाली होती. त्याची आठवण मालवणी मुलखाला आजही असून’ गावोगावी, बाजारातील हॉटेल मध्ये गजाली रंगल्या आहेत.

नितेश राणेंची मोठी ताकद – कणकवली विधान सभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यासाठी आम दार नितेश राणे यांनी मोठी मेहनत घेतली होती. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत नितेश राणे समर्थकांचे मनोबल वाढले आहे. आमचा उमेदवार सहज निवडून येईल अंसा राणे समर्थकांना विश्वास आहे. पण ठाकरे गटाचे म्हणणे वेगळे आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जे म ताधिक्य होते ते खासदार राणे यांच्यासाठी होते. अंतर्गत वादाचा फायदा आम्हाला मिळेल. यावेळी जनता आमच्या बाजूने जनता उभी राहील असं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular