25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriदेवरूख शहीद जवान स्मारकामध्ये, पाहायला मिळणार लढावू विमान

देवरूख शहीद जवान स्मारकामध्ये, पाहायला मिळणार लढावू विमान

स्मारकासाठी युद्धामधील लढावू विमान मिळावे अशी मागणी सुरक्षा मंत्रालयाकडे करण्यात आली होती.

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत देशाप्रती, जवानांप्रती आदर निर्माण व्हावा, येथील तरूणांना देशसेवेसाठी प्रेरणा मिळावी यासाठी शहीद जवान स्मारक उभारले आहे. हे स्मारक देवरूखसह तालुक्याच्या लौकीकात भर घालत आहेत. या स्मारकामध्ये टी- ५५ जातीचा युद्धातील रणगाडा, जीपवर माऊंट केलेली गन, लढावू नौकेची प्रतिकृती पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

देवरूखमध्ये येथील शिक्षण प्रसारक मंडळाने युद्धसामुग्री संग्रहालयाचा संकल्प केला आहे. आबालवृद्धांनी या संग्रहालयात दाखल झालेल्या हवाई दल विमानासह रणगाडे आदी सामुग्री प्रेक्षणीय या दृष्टीकोनातून न पाहता त्यातून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी, अशी संकल्पना आहे.

येथे शहीद जवान स्मारकासाठी मंजूर झालेल्या लढावू विमानाची बांधणी पूर्ण झाल्याने हे विमान एअरफोर्स अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहीद जवान स्मारकात बसविण्यात आल्याची माहिती देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाकडून देण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी हे विमान हैद्राबाद येथून देवरुखात दाखल झाले. मात्र पावसाच्या अडथळ्यामुळे त्याची जोडणी करून ते उभे करण्यात विलंब झाला होता.

हे लढावू विमान पाहण्यासाठी देवरूखवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. स्मारकासाठी युद्धामधील लढावू विमान मिळावे अशी मागणी सुरक्षा मंत्रालयाकडे करण्यात आली होती. वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. रक्षामंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, मदन मोडक यांच्या प्रयत्नामुळे एचपीटी- ३२ प्रकारचे लढावू विमान मंजूर झाले. दोन महिन्यांपूर्वी हे विमान हैद्राबाद येथून देवरूख नगरीत दाखल झाले. पावसाळा असल्याने विमानाची जोडणी करण्यात अडचणी येत होत्या.

मात्र गेले पाच ते सहा दिवस हैद्राबाद येथील एअरफोर्स अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विमानाची जोडणी करण्यात आली. शुकवारी सकाळी क्रेनच्या माध्यमातून हे विमान स्मारकामध्ये ठेवण्यात आले. विमानामुळे देवरूखच्या लौकिकात आणखीनच भर पडली असल्याची माहिती सदानंद भागवत, अध्यक्ष, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular