देवरुख:-कोकणातील तरुणांमध्ये टॅलेंट आहे,मात्र कोकणात रोजगार संधी उपलब्ध नसल्याने येथील तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली सारख्या शहरात स्थलांतरित होतो.हे स्थलांतर थांबवण्यासाठी व तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोकणासाठी स्वतंत्र उद्योग प्राधिकरण स्थापन करावे अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी देवरुख येथे एकदिवसीय धरणे आंदोलनात मांडली.
कोकणातील बेरोजगारी व गावागावातून रोजगारासाठी होणारे स्थलांतर याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गाव विकास समितीच्या संगमेश्वर विभागामार्फत देवरुख तहसील कार्यालय येथे बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.हे आंदोलनाला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आंदोलनाबाबत भूमिका मांडताना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे म्हणाले की,कोकणातील तरुणांनी शिकायचे,बॅग भरायची आणि मुंबई पुणे गाठायचं हा एकमेव कार्यक्रम शासनाने आपल्यासाठी ठेवला आहे.रोजगारासाठीचे धोरण कोकणात शासन पातळीवर राबवले जात नसल्याने बेरोजगारी वाढली आहे व गावागावातून तरुण नोकरीसाठी अन्य शहरात स्थलांतरित होत आहेत.कोकणातील तरुणांना तालुक्याच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, येथील तालुकानिहाय एमआयडीसी विकसित झाल्या पाहिजेत,त्यासाठी शासनाने धोरण निर्माण केले पाहिजे.कोकणात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने स्वतंत्र उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी सुहास खंडागळे यांनी यावेळी बोलताना केली.
संध्याकाळी चार वाजता गाव विकास समितीच्या शिष्टमंडळाने प्रमुख मागण्यांचे निवेदन देवरुख तहसीलदार यांना भेटून देण्यात दिले.यामध्ये तालुकानिहाय एमआयडीसी विकसित करणे,पर्यावरण पूरक उद्योग धंदे सुरू करण्यासाठी धोरण निश्चित करणे,व्यावसायिक शेतीला चालना,व पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन संस्था शासनाने कोकणात उभारावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
गाव विकास समितीच्या या आंदोलनाला देवरुख मधील सुप्रसिद्ध डॉ.विनय ढवळ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, जेष्ठ वकील ऍड. संदीप ढवळ, पत्रकार निलेश जाधव, सचिन मोहिते, सुरेश करंडे, प्रमोद हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन भोसले, बाळा पंदरे, नित्यानंद देसाई, खडी कोलवन सरपंच संतोष घोळम, कुणबी युवाचे सचिन रामाने, क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर, सामाजिक कार्यकर्ते शरद गायकवाड, दीपक शिंदे, वंचितचे संतोष जाधव आदी मान्यवर नागरिकांनी आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.
यावेळी गाव विकास समितीचे पदाधिकारी श्यामकर्ण भोपळकर,मनोज घुग,दिक्षा खंडागळे, अनघा कांगणे, मुझम्मील काझी, दैवत पवार, वैभव जुवळे, सुनिल खंडागळे, नितीन गोताड, विशाल धुमक, प्रशांत घुग, दिनेश गोताड, महेश धावडे, तुषार कुल्ये, एकता गोताड, रितेश गोताड, निखिल साळवी, रणजित गोताड, राज घुग, वैभव पवार, अमित रेवाले, महेंद्र घुग आदी पदाधिकारी उपस्थित होते.