27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeSports१४ वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बदलला, जडेजा स्विकारणार पदभार

१४ वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बदलला, जडेजा स्विकारणार पदभार

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोडले आहे. धोनीच्या जागी जडेजा पदभार स्वीकारणार आहे. जडेजा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. जडेजाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईचा संघ यावेळी आपले जेतेपद वाचवण्याच्या आणि पाचवे विजेतेपद पटकावण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरणार आहे. माही १४ वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार होता. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२००७ मध्ये टी-२० विश्वचषका दरम्यान धोनीला पहिल्यांदा टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले होते. भारताने ही स्पर्धा जिंकली आणि लांब केसांची हेअर स्टाईल असलेला महेंद्रसिंग धोनी जागतिक क्रिकेटमध्ये चमकला. २०२१ मध्ये आयपीएल हंगामातही धोनी कर्णधार म्हणून खेळला आणि त्याने संघाला विजय मिळवून दिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएल खेळत आहे आणि गेल्या काही काळापासून या स्पर्धेत त्याचा फॉर्म खूपच खराब आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की, महेंद्रसिंग धोनीचा कदाचित हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार आहे. २०२० च्या हंगामात, त्याने १४ डावात २०० धावा आणि गेल्या वर्षी आयपीएल २०२१ च्या १६ डावामध्ये १६.२९ च्या अगदी सामान्य सरासरीने ११४ धावा केल्या होत्या.

धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी २१३ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. संघाने एकूण १३० सामने जिंकले आहेत. यादरम्यान सुरेश रैनाने ६ सामन्यात कर्णधारपद भूषवले होते, त्यापैकी फक्त २ सामन्यात संघ जिंकला. या दोघांशिवाय संघाचा कोणीही कर्णधार नाही.

स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोनच दिवस आधी चेन्नईच्या व्यवस्थापनाने कर्णधारपदातील या मोठ्या फेरबदलाचा निर्णय जाहीर केला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २६ मार्चपासून खेळवला जाणार आहे. सलामीचा सामना चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular