26.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedअमेरिकेच्या करवाढीचा लोटेत उद्योगांना फटका…

अमेरिकेच्या करवाढीचा लोटेत उद्योगांना फटका…

भारतातील लहान-मोठ्या कारखानदारांची अडचण होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या परदेशी मालावर शुल्क आकारले आहे. भारतही त्यातून सुटलेला नाही. भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २३ टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. याचा थेट परिणाम १५ ते २० हजार कोटींची उलाढाल असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतील उद्योगविश्वावर होणार आहे. पहिल्या तीन महिन्यांत त्याचे परिणाम दिसतील. उद्योजकांनाही त्यांच्या मालाचे दर वाढवावे लागले. त्यातून मागणीमध्ये घट होण्याचा धोका आहे. लोटेतील घरडा कंपनीचे प्रकल्पप्रमुख आर. सी. कुलकर्णी याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘अमेरिकेतील आयात शुल्कात काही बदल होणार का, हे पुढील सहा महिने थांबून पाहावे लागणार आहे.

ट्रम्प यांनी विविध देशांवर आकारलेल्या शुल्कामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या निर्यातीवर किती परिणाम होईल, हे पुढील तीन महिन्यांत समोर येईल. अमेरिकेला कोणतीही वस्तू निर्यात करायची असेल, तर कंपन्यांना कर द्यावा लागणार आहे. तो कर कोणतीही कंपनी आपल्या नफ्यातून देणार नाही. कारण कोरोनानंतर कारखानदारांच्या एकूण नफ्याची टक्केवारी घटली आहे. त्यामुळे निश्चितच मालाचे दर वाढवावे लागणार आहेत. अमेरिकेला ती घेताना जादा दराने घ्यावी लागेल. ज्या छोट्या देशांवर अमेरिकेने कमी कर लादले आहेत, त्या देशांना चीनने माल पुरवला आणि तेथून तो अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था झाली, तर भारतातील लहान-मोठ्या कारखानदारांची अडचण होणार आहे.’

RELATED ARTICLES

Most Popular