31.4 C
Ratnagiri
Friday, May 16, 2025

वीज समस्येबाबत ठाकरे गट आक्रमक, लांजा महावितरणवर धडक

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरासह तालुक्यातील जनता त्रस्त...

रत्नागिरी बसस्थानकात वृद्ध ठार…

एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या शहरातील लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी...

मिरकरवाडा जेटीवर शाकारलेल्या नौका हटवा

पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम यंदा ३१ मे रोजी...
HomeRatnagiriरत्नागिरीत दोघांकडून ब्राऊन हेरॉईन, गांजा जप्त

रत्नागिरीत दोघांकडून ब्राऊन हेरॉईन, गांजा जप्त

३ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरीत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी दोन कारवायांत ब्राऊन हेरॉईन आणि गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अदनान नाजीममियाँ नाखवा (वय २५, रा. जुना फणसोप, ता. रत्नागिरी), मन्सूर अली निजाम पठाण (४०, रा. मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. शहराजवळील नाचणे-गुरुमळी येथे ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाच्या १५४ पुड्या विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून समारे पाऊण लाखाचा ब्राऊन हेरॉईन, वाहनासह २ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अमली पदार्थाविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे.

त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी पथक तयार केले. काल सायंकाळी हे पथक गस्त घालत असताना नाचणे-गुरुमळी येथे सायंकाळी अदनान नाखवा हा रस्त्यालगत आडोशाला उभा होता. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसत होत्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडे ७७ हजारांचे ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ आढळून आला. विक्रीसाठी त्याने तो बाळगल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे ७७ हजारांच्या ब्राऊन हेरॉईनच्या १५४ पुड्या विक्रीसाठी आणलेल्या सापडल्या. तसेच १ लाख २८ हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, गांजाची तस्करी करणाऱ्या सांगलीतील एकाला शहर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा सुमारे ३ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

काल (ता. ७) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान शहर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक श्याम आरमाळकर व पोलिस अंमलदार हे कोकणनगर ते प्रशांतनगर अशा परिसरात गस्त घालत होते. तेव्हा साई-भूमीनगर बिल्डिंगच्या मागील बाजूस ते आले. त्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करत असताना दिसून आला. त्याला या पथकाने जागीच थांबवून त्यांची चौकशी केली. त्याचे नाव-गाव विचारले असता, त्याने आपले नाव मन्सूर अली निजाम पठाण (वय ४०, रा. मिरज, जि. सांगली) असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली. त्याच्याकडील लाल रंगाच्या प्रवासी बॅगमध्ये पाच ब्राऊन कलरचे प्लास्टिक पाऊच होते. ज्यामध्ये उम्र वासाचा गांजासदृश अमली पदार्थ मिळून आला. ५ किलो ५५.५ ग्रॅम वजनाचा सुमारे ३ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट १९८५चे कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, हवालदार अरुण चाळके, अमोल भोसले, आशीष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, अमित पालवे, कौस्तुभ जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular