27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriजिल्हा मोटरमालक असोसिएनशचा संघर्षाचा इशारा - सिमेंट वाहतूक बंद

जिल्हा मोटरमालक असोसिएनशचा संघर्षाचा इशारा – सिमेंट वाहतूक बंद

काही महिन्यापासून युनियनने ठरवलेले भाडे कंपनीकडून मिळत नसल्याने ट्रक मालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकना ठरलेले भाडे मिळत नसल्याने, वाढत्या महागाईमुळे त्रस्त ट्रक मालकांनी सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांना डावलून जर वाहतूक सुरू करण्यात आली तर उग्र संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तथा बंड्याशेठ साळवी यांनी दिला आहे. याबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना बंड्याशेठ साळवी यांनी सांगितले की, रत्नागिरी येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व अन्य ठिकाणी सिमेंटची वाहतूक होत असते. मात्र गेल्या काही महिन्यापासून युनियनने ठरवलेले भाडे कंपनीकडून मिळत नसल्याने ट्रक मालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

त्यामुळे यापुढे जेवढा माल तेवढेच भाडे मिळावे यासह अनेक मागण्या युनियनकडून करण्यात आल्या आहेत. विशेषतः ४० टनापेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या बंद करण्यात याव्यात व स्थानिक गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रम णे ऑर्डर देताना त्या ऑफलाईन देण्यात याव्यात, स्थानिक ऑर्डर सगळ्यांना समान देण्यात याव्यात, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वाहतुकदारांना समान न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कंपनी प्रशासन चालकांच्या समस्या ऐकून घेत नाही, त्यामुळेही वाहतूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. कंपनीच्या पार्टीने गाडी खाली करुन घेतली नाही तर ७०० रुपये भत्ता आणि दुसऱ्या दिवशी खाली केली तर दोन हजार रुपये भरपाई मिळावी.

ट्रक चालकांकडूनच कंपनी जीपीएसचे चार्जेस घेत असल्याने ते घेऊ नयेत अशी मागणी असोसिएशनने केली आहे. युनियनला नोंदणी झाल्याशिवाय नवीन गाड्यांना परवानगी देण्यात येऊ नये यासह अनेक मागण्या असोसिएशनने कंपनीला देण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत. याबाबत वेळोवेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी असोसिएशनने संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. वाहतूकदारांबाबत योग्य निर्णय होत नसल्याने ट्रक मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. त्यामुळे बुधवार २३ ऑगस्टपासून रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनने सिमेंट वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असून जवळपास सव्वाशे ते दिडशे ट्रक यामुळे उभे राहणार आहेत.

कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ट्रक व्यवसायिकांनी आणि मोटार मालक असोसिएशनने केला आहे. त्यामुळे बुधवारपासून सिमेंट वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूकदारांना डावलत जर वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला तर मग संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मोटारमालक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular