25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeKhedराष्ट्रवादी खेड तालुकाध्यक्षपदी उमेश कदम

राष्ट्रवादी खेड तालुकाध्यक्षपदी उमेश कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याहस्ते त्यांना मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

तालुक्यातील धामणी येथील युवा कार्यकर्ते, माजी सरपंच, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपजिल्हाध्यक्ष, धामणी विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन उमेश रामचंद्र कदम यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खेड तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याहस्ते त्यांना मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

यावेळी जयंत पाटील, चित्राताई चव्हाण, रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कानोजे, जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम, गणेश कदम, सरवर कुडूपकर, सुरज जोगळे, मारुती पालणकर, संतोष धाडवे, रविंद्र रटाटे, सुजित लोखंडे, रंजन महंत, धीरज कदम, भावेश लागण आदीसह रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करू, आपण पक्षाच्या पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उमेश कदम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular