28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriउद्धव ठाकरे यांचा सोमवारी जिल्हा दौरा

उद्धव ठाकरे यांचा सोमवारी जिल्हा दौरा

संवादयात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ५ फेब्रुवारीला जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथे ते संवादयात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिली. खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, ‘तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रमोद शेरे उपस्थित होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्गचा दौरा करतील.

त्यानंतर ५ ला सकाळी १० वाजता कणकवली येथून राजापूरकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता राजापूर शहरातील जवाहर चौक येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता राजापूरहून श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराकडे प्रयाण करतील. सकाळी ११.४५ वाजता श्रीदेव धूतपापेश्वर मंदिर दर्शन व मंदिर बांधकामाची पाहणी करतील. दुपारी १२.१५ वाजता धूतपापेश्वर मंदिर येथून पावसमार्गे रत्नागिरी शहराकडे प्रयाण करतील. दुपारी १.४५ वाजता शिवसेनेच्या आठवडाबाजार येथील कार्यालयात ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी २.१५ वाजता आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी भेट देतील.

३ वाजता साळवी यांच्या निवासस्थानाहून उक्षी-वांद्रीमार्गे संगमेश्वरकडे जाणार आहेत. सायंकाळी ४.१५ वाजता संगमेश्वर येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. सायंकाळी ४.३० वाजता संगमेश्वर येथून चिपळूणकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.४० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे शिवसैनिकांशी संवाद साधतील. सायंकाळी ६.१५ वाजता चिपळूण येथून खेडकडे रवाना होतील. सायंकाळी ७.०५ वाजता वंदे भारत एक्स्प्रेसने खेडहून मुंबईकडे रवाना होतील. ठाकरे यांच्या दौऱ्यात खासदार संजय राऊत, शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी सहभागी होणार आहेत असे महाडिक यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular