रत्नागिरी रेल्वेस्थानक या ठिकाणी रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या परिसरामध्ये असलेली पार्किंग सुविधा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पोलिस विभागाकडून होणारी कारवाई सध्या स्थगित करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. रेल्वेस्थानक परिसरामध्ये येणाऱ्या नागरिकांकडून आरटीओ कार्यालयाकडून होणारी कारवाई शिथिल करावी, अशी मागणी होत होती.
भारतीय जनता पार्टीने या विषयाकडे गांभीर्याने पाहिल्यामुळे रेल्वेस्थानक परिसरामध्ये येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह मंडल अध्यक्ष दादा दळी, सुशांत पाटकर, सरचिटणीस उमेश देसाई, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, राजेश पाथरे, वैभव पोतकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.