27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriबॅनर लावले म्हणजे विकास होत नाही, पालकमंत्र्यांचा टोला

बॅनर लावले म्हणजे विकास होत नाही, पालकमंत्र्यांचा टोला

बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना हा लाभ मिळवून देण्याचं काम भैय्यांनी केले आहे.

रस्त्याची कामे केली आणि बॅनर लावले म्हणजे विकास होत नाही तर सर्वसामान्यांच्या मागे उभे राहणे याला विकास म्हणतात, असा खोचक टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे बोलताना लगावला. पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत लांजा तालुक्यातील बांधकाम कामगारांना सरकारच्या बांधकाम कामगार योजने मधून साहित्य संच वाटपाचा कार्यक्रम लांजा पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर रत्नागिरी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, शिवसेना (शिंदे) गट जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपविभागीय अधिकारी अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, सचिन डोंगरकर, वसंत घडशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यासपीठावर बसण्याचा अधिकार फक्त पालकमंत्री उदय सामंत यांनाच नाही तर येथे असलेल्या बांधकाम कामगारांना सुद्धा आहे.

म्हणून मी तुमच्यातले कामगारं आज माझ्या लाईनमध्ये व्यासपीठावर बसवले. शासनाच्या विविध योजना रत्नागिरी तालुक्यातील घराघरातपर्यंत पोचवण्याचं काम तिकडचा आमदार म्हणून मी करत आहे. मात्र लांजा-राजापूर मध्ये या योजना का पोचत नाहीत? असा प्रश्न पालकमंत्री म्हणून माझ्या समोर उभा राहिला आहे. आज भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखालील लांजा मधील अनेक बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना हा लाभ मिळवून देण्याचं काम भैय्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular