26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriविकासकामाची टक्केवारी नको, आशीर्वाद द्या - पालकमंत्री उदय सामंत

विकासकामाची टक्केवारी नको, आशीर्वाद द्या – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीच्या विकासाची जबाबदारी ज्या पद्धतीने मी घेतली त्याप्रमाणे तुमच्या विकासाची जबाबदारी माझी आहे.

विकासकाम केल्यानंतर टक्केवारी घेणारा भी मंत्री नाही, तर मला फक्त आशीर्वाद द्या, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी दांडेआडोम येथे सांगितले. सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदारसंघात काळी मांजरे फिरू लागली आहेत, असे सांगतानाच पाच वर्षे कुठे होता, असा जाब त्यांना विचारा, असे मंत्री सामंत यांनी आवाहन केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दांडेआडम येथील विकासकामांसाठी पालकमंत्री सामंत यांनी १ कोटींचा निधी दिला होता. त्यांचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी ते म्हणाले, ‘रत्नागिरीच्या विकासाची जबाबदारी ज्या पद्धतीने मी घेतली त्याप्रमाणे तुमच्या विकासाची जबाबदारी माझी आहे.

मागील २५ वर्षांची परंपरा कायम राखल्याचे दांडेआडोमवासीयांनी आजच्या उपस्थितीने दाखवून दिले आहे. तुमचे प्रेम आजची गदीं सांगून गेली. सर्वसामान्यांच्या सरकारबरोबर काम करतोय, त्याचा मला आनंद आहे. मी दर आठवड्याला शनिवार व रविवारी तुमच्या सेवेसाठी मतदारसंघात असतो आणि जनतेची सेवा करतो. जी लोकं आपल्यासाठी काम करतात त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला तालुकाप्रमुख बाबू म्हाप, सरपंच कैलास तांबे, उपसरपंच रिया तुळसणकर, गावकर आनंद तांबे, नारायण सनगरे, अरुण झोरे, रामचंद्र मांडवकर, सुनील मांडवकर, प्रीती कारकर, ज्योती पोमेंडकर, दीपाली तांबे, देवदत्त पेंडसे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular