27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...
HomeKhedवणवे रोखण्यासाठी वनक्षेत्रात जाळरेषा, लोटे परिसरात यशस्वी प्रयोग

वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्रात जाळरेषा, लोटे परिसरात यशस्वी प्रयोग

मागील तीन वर्षांपासून येथे जाळरेषा मारल्या जात आहेत.  

अतिरिक्त लोटे एमआयडीसीलगत असलेल्या ११४ हेक्टर क्षेत्रात वनविभागाकडून जमिनीवर जाळरेषा मारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी निरीक्षक (फायर वॉचर) नियुक्त केले आहेत. त्यामुळे या परिसरात वणवे लागले तरी वनसंपदेची कमीत कमी हानी होते. येथील फळझाडे वाचवण्यात वनविभागाला यश आले आहे. वणवे रोखण्यासाठी जाळरेषांचा पॅटर्न मागील तीन वर्षांपासून यशस्वी झाला आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीलगत असगिणी, आयनी, मेटे परिसरातील ११४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. या वनक्षेत्रात विविध प्रकारची रोपे वनविभागाकडून लावण्यात आली आहेत. या वनक्षेत्रात गवताचे प्रमाण जास्त आहे. या गवतामध्ये बिबट्यासह विविध वन्यप्राण्यांचा वावर असतो.

उन्हाळ्यात तापमान वाढून येथे वणवे लागतात, तर कधी अनोळखी लोक मुद्दाम वणवे लावतात. त्यामुळे दरवर्षी येथील वनसंपदेची हानी होत होती. वन्यप्राणीही येथून पळून जात होते. वनविभागाकडून वणवा नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही केली जात असली तरी बऱ्याचदा या घटनांची माहिती उशिरा मिळते. त्यामुळे या वणव्यात वनसंपत्तीचे मोठे नुकसान होते. वणवे रोखण्यात जाळरेषा महत्त्वाच्या असतात. विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या सूचनेनुसार, खेडचे वनपाल सुरेश उपरे यांनी या वनक्षेत्रात जाळरेषा मारण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून येथे जाळरेषा मारल्या जात आहेत.

वणवे लागू नयेत म्हणून वनरक्षक अशोक ढाकणे, परमेश्वर डोईफोडे, रानबा बंबर्गेकर, प्रियंका कदम, विराज संसारे हे या वनक्षेत्रावर लक्ष ठेवून असतात. जाळरेषा मारताना जंगलातील रस्त्याकडेला जे गवत आहेत, ते काढून टाकण्यात आले. वनक्षेत्रात एक ते दीड किमी लांबीच्या आडव्या-तिडव्या जाळरेषा (फायर लाइन) मारण्यात आल्या आहेत. पेटलेला वणवा जाळरेषेपर्यंत येऊन थांबतो. त्यामुळे या भागात वणवे लागले तरी ते लांबपर्यंत पसरत नाही. त्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत नाही. यावर्षी पावसाळा संपल्यानंतर जाळरेषा मारण्याचे काम हाती घेण्यात आले. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येथे वणवे लागले; मात्र वनसंपदेचे फार नुकसान झाले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular