26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriकोणी कुठे गेला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक ढळणार नाही – आम.साळवी

कोणी कुठे गेला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक ढळणार नाही – आम.साळवी

शिवसेनेत असताना आमदारकी,  मंत्रिपदे भूषवून सुद्धा उदय सांमत शिवसेना सोडून गेले, हे त्यांचे दुर्दैव आहे.

युवानेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत. १६ सप्टेंबरला ते कोकणात येणार आहेत. यासाठी संगमेश्वर तालुका शिवसेनेने पूर्व तयारीसाठी साडवली येथे मेळावा घेतला त्यावेळी राजन साळवी बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, माजी उपसभापती जया माने, रोहन बने, संतोष थेराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी बोलताना सांगितले कि, तालुक्यातील शिवसैनिक अतिशय निष्ठावान आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम आहे, असे सांगितले.

सुभाष बने यांनी संपूर्ण तालुका हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असल्याचे सांगितले. तर राजन साळवी यांनी बोलताना आपण संपूर्ण जिल्ह्यात बैठका घेतल्या आहेत. यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक कुठेही बाहेर गेलेला नाही. शिवसेनेच्या सर्व सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगितले.

शिवसेनेत असताना आमदारकी,  मंत्रिपदे भूषवून सुद्धा उदय सांमत शिवसेना सोडून गेले, हे त्यांचे दुर्दैव आहे. दोन वेळा आमदारकी उपभोगूनही सदानंद चव्हाणना शिवसेनेचा विसर पडला. कोणी कुठे गेला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक ढळणार नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा या कोकणच्या बालेकिल्ल्यात अधिकच जोमाने फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी व्यक्त केला.

तसेच सदानंद चव्हाणांच्या सोबत गेलेल्यांना पश्चाताप होत आहे. आणि ते परत माघारी फिरले आहेत. आता शिवसैनिकांनी गाफिल राहून चालणार नाही. सदस्य नोंदणी चळवळ वाढवा, गावागावात पदाधिकारी नेमा, येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राहिले पाहिजे, असे राजन साळवी यांनी ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या झंझावाता समोर कोणीही आणि कोणताही पक्ष टिकणार नाही. सामंतांना शिवसेनेने आमदारकी दिली, मंत्रिपदे दिली. राष्ट्रवादीत असताना जे शरद पवारांचे होऊ शकले नाहीत ते शिवसेनेत उद्धवजींचे कसे होतील, असा खोचक टोला लगावला. आणि त्यांचे पुढील भवितव्य अंधकारमयच असेल, असे साळवी यांनी म्हटले.

RELATED ARTICLES

Most Popular