25.6 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiri१ जुलै - नॅशनल डॉक्टर्स डे

१ जुलै – नॅशनल डॉक्टर्स डे

आज डॉक्टरांचा दिवस ! इंडियन मेडिकल असोसिएशनकडून दरवर्षी १ जुलैला नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे अजूनही एक कारण आहे ते या दिवशी देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी देखील असते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आपल्या प्राणाची तमा न बाळगता रुग्णसेवेला वाहून घेणाऱ्या सर्व डॉक्टर्सना आजचा दिवस समर्पित.

कोरोना काळामध्ये आपण डॉक्टरांनी घेतलेली दिवसरात्र मेहनत सर्वजण जाणतो. कोरोनाच्या अचानक आलेल्या संकटाला न घाबरता, डगमगता धीराने सामना करण्याचे सामर्थ्य या वैद्यकीय पेशामध्येच दिसून आले. अनेक डॉक्टर, नर्स इतर सहाय्यक कर्मचारी यांना रुग्णांची सेवा करताना या कोरोनाची लागण झाली, काही बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागले तर काहीना आपले प्राण गमवावे लागले.

रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी घेतलेला कोरोनाचा अनुभव पाहूया. त्या म्हणाल्या डॉक्टर म्हणून काम करताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दिलासा देण्याची, त्यांच्याशी सकारात्मक बोलायची मोठी जबाबदारी पूर्णतः आमच्यावर असते. कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून आम्हीही तेच करत होतो. येणाऱ्या प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह सपोर्ट देण्याचं काम सुरु होते. प्रत्येक वेळी पैसा कामी येत नाही, पण प्रसंगी दिलेला आधाराचा एक शब्द पुरेसा पडतो.

आम्ही दोघेही डॉक्टर असल्याने कोरोनाची आणि आमची कधी ना कधी गाठभेट होणार हे आम्ही गृहीतच धरून होतो. त्यामुळे संपूर्ण काळजी घेऊन, नियमित व्यायाम करून, लसीकरण, आहारावर नियंत्रण, कोरोनाचे सर्व नियम पाळून देखील डॉ. निलेश आणि थोड्या दिवसाने मी कोविड पॉझिटिव्ह झाल्याने, आमच्या निमित्ताने २८ मे २०२१ ला कोरोनाचे संकट घरी आले. पण आम्ही आधीपासून घेतलेली खबरदारी, केलेले लसीकरण, व्यायाम, यामुळे यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. अनेकांनी या काळामध्ये विशेष साहाय्य केले. अखेर सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने कोरोना सारख्या जीवघेण्या आजारामधून बरे होऊन घरी परतलो. त्यामुळे नियमाचे पालन, लसीकरण आणि वेळेवर तपासणी याच त्रिसूत्रीचा अवलंब करणे हाच खरा उपचार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular