21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRatnagiriकेळशी परिसरात बॉक्साईटच्या उत्खननाने धुळीचे लोट

केळशी परिसरात बॉक्साईटच्या उत्खननाने धुळीचे लोट

आंबा, काजु बागायतदार चिंतेत आहे. 

तालुक्यातील केळशी परिसरातील रोवले, उंबरशेत आदी ठिकाणी ‘बॉक्साईटचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा फटका या परिसरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या आंबा, काजू बागायतदाराना बसत आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून जाणाऱ्या भरधाव डंपरमुळे या परिसरात अपघातांचे प्रमाणाण वाढले आहे. केळशी परिसरातील रोवले, उंबरशेत येथे म ोठ्या प्रमाणांत बॉक्साइडचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील वातावरणात धुळीचे कण पसरले असून याचा फटका येथील बागायतदारांना बसत आहे. आंबा काजूच्या ऐन मोहरावेळी उत्खनन सुरू असल्याने धुळीचे कण मोहरावर बसत असल्याने येथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे यावेळी आंबा पीक कमी मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. रोवले, उंबरशेत परिसरातील माळरानावर. राजरोसपणे दिवसाला हजारो टन बॉक्साइड उत्खनन होत आहे. यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. उत्खनन केलेला बॉक्साइड डंपरच्या साह्याने भर वस्तीतून जहाजावर नेले जातात. हे डंपर अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त भरलेले असतात. यामुळे मार्गावरील रस्त्यावर खडी पडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर डंपर क्षमतेपेक्षा भरले जात असल्यामुळे मार्गावरील घरांवर यातील धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

बॉक्साइट भरून घेऊन जाणारे व रिकामे येणारे डंपर चालकांमध्ये आपला नंबर पहिला लागावा, यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पहावयास मिळते. चालकांच्या पहिला नंबरच्या मोहापायी भरधावपणे धावणाऱ्या डंपरमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच यामध्ये काहींनी आपला जीवही गमावल्याचे समोर येत आहे. बॉक्साइड उत्खनन करण्यासाठी डीगिंग केले जाते. तसेच अनेकदा ब्लास्टिंगही केले जाते. यामुळे बसणाऱ्या दणक्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असल्याचे समोर येत आहे. दापोली मंडणगड तसेच रायगड जिल्ह्याला जोडणारा या परिसरातील एकमेव पूल म्हणून मांदिवली पुलाला पाहिले जाते.

सध्या या पुलाची अवस्था दयनीय आहे. या पुलाची अवजड वाहने वाहून नेण्याची नऊ टनाची क्षमता आहे. असे असताना बॉक्साइड ने भरलेले ४० ते ४५ टन वजनाचे डंपर या पुलावरून वाहून नेले जातात. या पुलाच्या मांदिवलीकडील भागाला तडा गेला आहे. मात्र याच पुलावरून बॉक्साइटने भरलेले अवजड डंपर वाहतूक होत असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रोवले- उंबरशेत परिसरात होणारे उत्खनन थांबवावे व क्षमतेपेक्षा होणारे अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी व वाढत असलेल्या अपघातांना आळा बसवावा, अशी मागणी पंचक्रोशीतून होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular