28 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज पहिला T20 सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20...

खेडमध्ये पूर ओसरला नुकसानीचा आढावा सुरु

खेडमधील पूर शुक्रवारी पहाटे ओसरला आणि रात्रभर...

भरकटलेल्या महाकाय जहाजाला वाचविण्यासाठी समुद्रात थरार!

धो-धो पाऊस.. सोसाट्याचा वारा.. खवळलेला समुद्र अशा...
HomeKhedलोटेतील उद्योगांना निवडणुकांची झळ

लोटेतील उद्योगांना निवडणुकांची झळ

राज्यांतील मोठ्या संख्येने कामगार निवडणुकीच्या प्रचार मोहिमेपासून आपापल्या गावी आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे लोटे एमआयडीसीतील अनेक कारखान्यांमध्ये कामगार टंचाई निर्माण झाली आहे. या पाच राज्यांतील कामगारवर्ग प्रचार आणि मतदानासाठी गेल्या महिन्यापासून आपापल्या राज्यांत गेल्याने लोटे येथील उद्योगांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे उद्योजकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून मानल्या गेलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये मतदान आणि निवडणूक निकाल लागले. लोटे एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेले या राज्यांतील मोठ्या संख्येने कामगार निवडणुकीच्या प्रचार मोहिमेपासून आपापल्या गावी आहेत.

बदलत्या राजकारणात आता सेवाभावी कार्यकर्ता कमी होऊन “पगारी” कार्यकर्त्यांची चलती असल्याने या परप्रांतीय कामगारांना अचानक मोठी मागणी निर्माण झाली. यातूनच हे शेकडो कामगार त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. गेले महिनाभर हे कामगार आपल्या मूळ गावी मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळे उद्योजकांना दसऱ्यापासूनच परप्रांतीय कामगारांची कमतरता जाणवत आहे. लोटे एमआयडीसीतील केमिकल उद्योग इंजिनिअरिंग, बांधकाम आदी उद्योग-व्यवसायांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील कामगारांची बांधकाम क्षेत्रात मोठी मागणी आहे. हे कामगार ग्रुपने एकत्र येतात. एकत्र राहतात. त्यांच्यापैकी एक मुकादम असतो. सर्व व्यवहार त्याच्याकडे असतात. कारखान्यांमध्ये जे काम स्थानिक लोक करत नाहीत ते काम परप्रांतीय कामगार करतात. अनेक कारखान्यांमध्ये मुख्य प्लांटच्या ठिकाणी परप्रांतीय कामगार असतात. हे कामगार दसरा-दिवाळीच्या सुटीसाठी म्हणून गावाकडे गेले होते नंतर प्रचार मोहिमेमध्ये अडकून पडले. आता निकालानंतर ते कामाच्या ठिकाणी परतण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular