28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यासाठी पंतप्रधानांची नवी योजना

रत्नागिरी जिल्ह्यासाठी पंतप्रधानांची नवी योजना

केंद्र सरकारनं यासाठी विशेष 'मिश्टी' योजना बनवली आहे.

भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालवण इथं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन पार पडलं. यानंतर उपस्थितांना आणि विशेषकरुन कोकणवासियांना संबोधित करताना मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण या किनारी भागांच्या विकासकामांचा समावेश आहे. मोदी म्हणाले, सिंधुदुर्गात चिपी विमानतळ आता सुरु झालं आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे.

इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना बनवण्यात येत आहेत.  समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मँमुव्हजचा (कांदळवन/बोली भाषेत चिपी) भाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष ‘मिश्टी’ योजना बनवली आहे. ज्या मिश्टी योजनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला ती योजना ५४० स्वेअर किमी अंतरावर राबवली जाणार आहे. यामध्ये ११ राज्यांमध्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात मँगुव्हजचा विकास केला जाणार आहे.

यामध्ये कोकणचाही सहभाग आहे. मोदी पुढे म्हणाले, यांमध्ये मालवण , आचरा, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्गसहित महाराष्ट्रातील अनेक साईट्सना मँगुव्हज मॅनेजमेंटसाठी निवड करण्यात आली आहे. यामुळं वारसा आणि विकास हाच विकसित भारताचा मार्ग आहे. त्यामुळं या क्षेत्रात आपल्या गौरवशाली परंपरेच्या संरक्षणाचा प्रयत्न केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular