24.8 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunनिवडणूक जाहीर होताच चिपळुणात वेगवान घडामोडी; राजकीय खलबते

निवडणूक जाहीर होताच चिपळुणात वेगवान घडामोडी; राजकीय खलबते

२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम मंगळवारी जाहीर होताच चिपळूण मध्ये राजकीय घडाम ोडींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुकांनी तात्काळ पक्षश्रेष्टी, नेते व थेट मतदारांशी देखील संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी राजकीय खलबते देखील सुरू झाली आहेत. महायुती, महाविकास आघाडी या बाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची प्रचंड ‘गर्दी दिसून येत आहे. तसेच यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष पद अनारक्षित असल्याने यावेळच्या निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. गेले तीन वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेली चिपळूण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अखेर जाहीर झाली. २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सुमारे महिनाभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने इच्छुक उमेदवारांना अगदी थोडा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होताच इच्छुक ऍक्शनमोड वर आले आहेत.

जाणते राजे रमेशभाई – सर्व राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी करण्यांत येत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार चिपळूणचे जाणते राजे म्हणून जनतेने पदवी दिलेले रमेशभाई कदम यांनी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना नेते आम. भास्कर जाधव तसेच माजी खासदार विनायक राऊत नेतृत्व करत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम हे देखील इच्छुक असून त्यांनी देखील जोरदार तयारी केली आहे. तसेच आम. भास्कर जाधव यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरगल हे देखील उबाठा कडून इच्छुक आहेत.

भाजप स्वबळावर ? – मागील निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवत भाजपने येथे चमत्कार घडवला होता. भाजपच्या सुरेखा खेराडे यांनी दमदार विजय प्राप्त करून त्या थेट जनतेतून निवडून आलेल्या भाजपच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील भाजपने पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. भाजपच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे आणि चिपळूणमध्ये अजातशत्रू म्हणून ओळख असलेले मंगेश उर्फ बाबू तांबे हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे भाजपकडून ३ ते४ उमेदवार स्पर्धेत पुढे आले आहेत.

शिंदे गटानेही कंबर कसली – शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून म ाजी गटनेते उमेश सकपाळ तसेच माजी उपनगराध्यक्ष प्रसिद्ध व्यापारी सुधीरशेठ शिंदे यांनी देखील कमर कसली असून त्यांनी देखील पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढाण्याची इच्छा जाहीर करून कामाला सुरुवात केली आहे. मित्र पक्षांची तयारी बघता राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने जोरदार तयारी केली असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक मिलिंद कापडी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून त्यांनी काम ाला देखील सुरुवात केली आहे. तसेच या पक्षाकडून एखादा मुस्लिम उमेदवार देण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेस स्वबळावर – काँग्रेसने तर सरळसरळ वेगळी चूल मांडली आहे. स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली असून नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लियाकत शाह हे निवडणूक लढवणार हे स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. परंतु चिपळूण शहरात काँग्रेसचे प्राबल्य असून आपल्या ताकदीचा प्रत्यय यावा तसेच कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याची स्पष्ट माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस यावेळी नसेल हे स्पष्ट झाले आहे.

अपक्ष उमेदवार – यावेळी अपक्ष उमेदवार हा मोठा कळीचा मुद्दा ठरला असून जेष्ठ पत्रकार सतीश कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट, उबाठा, भाजप, अजित दादा गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, काँग्रेस आणि अपक्ष सतीश कदम अशी ही चुरशीची लढत येथे होण्याची शक्यता असून निवडणूक जाहीर होताच वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच इच्छुक जणू अॅक्शनमोडवर आले असून काही ठिकाणी तडजोडीचे राजकारण देखील सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular