रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील ५ जण सकळच्या सुमारास राजीवडा खाडीतून निघाले असताना खाडी मुखाजवळ बोट बुडून अपघात घडला. यापूर्वीही त्याच ठिकाणी कर्ला राजीवडा येथील अनेक मासेमारी बोटी बुडाल्या आहेत. खाडी मुखाशी एका बाजूला सॅण्ड बार आणि दुसऱ्या बाजुला असणारे मोठाले खडक अशा चिंचोळ्या धोकादायक भागातून जात असताना खडकावर आपटून बोट तिथेच बुडाली. बोटीमध्ये असलेल्या ५ जणांपैकी ४ जणांना भाटकरवाडा येथील मच्छीमारी बोटीने वाचवले. मात्र एक जण बेपत्ता आहे.
राजीवडा मांडवी खाडी मुखाशी गाळ साचत आहे. हा गाळ वर्षांनुवर्षे काढला जात नसल्याने धोकादायक भाग बनला आहे. सदर बोट ही खलील सोलकर यांनी इमरान सोलकर यांच्याकडून करारावर घेतली होती. म्हणून ही बोट जयगडला घेऊन जात होते. पण जाताना मोठी लाट आली आणि बोट उलटली. बोटीतील ४ खलाशी वाचले. पण एक खलाशी बेपत्ता झाला आहे आणि त्याचा शोध घेण्यात येत. मांडवी खाडी मुखाशी राजीवडा येथील ही मासेमारीची बोट बुडाली.
नईम शेख वय २१, उजेला मुल्ला वय २१, आफशान मेहबुब मुजावर वय २२, ऐयाज माखजनकर वय ३८ हे चार जण या अपघातातून वाचलेत. राजीवडा येथील एम इब्राहिम पर्ससीन मासेमारी नौका जयगड येथे घेऊन जाणेसाठी इमरान सोलकर याच्या मालकीची बोट एम इब्राहिम घेऊन जात होते. एकूण ५ खलाशी बोटीवर होते. त्यातील बेपत्ता खलाशाचा मृतदेह अखेर काल मांडवीच्या समुद्रकिनारी सापडला असून, बोट देखील बुडाली तिथेच रुतली होती. ती बाहेर ओढून काढण्यात आली.