30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeMaharashtraमहायुतीची पहिली यादी नवरात्रोत्सवात? भाजपच्या ४० उमेदवारांची होणार घोषणा

महायुतीची पहिली यादी नवरात्रोत्सवात? भाजपच्या ४० उमेदवारांची होणार घोषणा

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांसह १६५ लढविल्या होत्या.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक १० ते १५ नोव्हेंबरच्या आसपास होईल, हे गृहीत धरुन भाजपची पहिली यादी नवरात्रीच्या सुरुवातीला घोषित केली जाईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटस्थापनेच्या आधी महाराष्ट्रात दोन टप्प्यांत प्रवास करणार आहेत. शहा २४ सप्टेंबर रोजी दुपारी नागपुरात पोचत आहेत. ते २४ आणि २५ सप्टेंबर या दोन दिवसांत मुंबई वगळता सर्व विभागांची बैठक घेतील. भाजपने १६० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांसह १६५ लढविल्या होत्या. या वेळीही तितक्याच जागा थोड्याफार फरकाने लढविण्याचा पक्षाचा निर्णय झाला आहे, असे सांगण्यात येते.

कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हेच ध्येय असल्याने याबाबत शिंदे गट आणि अजित पवार गटाला विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले. घटस्थापनेच्या आसपास भाजप पहिली यादी घोषित करेल, असेही समजते. या यादीत किमान ४० नावे असतील. ही नावे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या देशातील प्रमुख नेत्यांशी सल्लामसलत करून निश्चित केल्याचेही समजते. या यादीबरोबरच महायुतीचीही नावे घोषित व्हावी, असे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात विश्वासात घेण्यात येणार आहे. शहा २४ सप्टेंबरला नागपुरात पोहोचतील.

त्याच दिवशी विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची दोन तास बैठक घेऊन ते लगेचच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला पोहोचतील. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाल्यावर ते त्याच दिवशी, २४ सप्टेंबर रोजी महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी रात्री चर्चा करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील, असे समजते. ते दुसऱ्या दिवशी, २५ सप्टेंबरला सकाळी उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून पश्चिम महाराष्ट्रासंबंधी कोल्हापुरात बैठक घेतील. अजित पवार गटात असलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या १,१०० खाटांच्या रुग्णालयाचे ते उद्घाटन करणार आहेत.

महायुती १६५ जागा जिंकेल ! – केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा हा दौरा महायुतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पक्षाची स्थिती सुधारली असून महायुती १६५ पर्यंत जागा जिंकू शकेल, असा एक सर्वेक्षण अहवाल पक्षाला मिळाला आहे. शहा विविध मोर्यांच्या बैठका घेतील.

RELATED ARTICLES

Most Popular