26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeDapoliउत्तरेकडील वाऱ्यामुळे मासेमारीला 'ब्रेक' - मच्छीमार हवालदिल

उत्तरेकडील वाऱ्यामुळे मासेमारीला ‘ब्रेक’ – मच्छीमार हवालदिल

७० टक्के नौका आंजर्ले खाडीतच नांगर टाकून आहेत.

उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे हर्णे बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. गेले आठ दिवस वाऱ्यामुळे मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना मासळीही मिळालेली नाही. ऐन हंगामात जोरदार वारे आणि मासळी मिळत नसल्याने मोठा फटका व्यावसायिकांनाही बसला आहे. येथील बंदरावर भरणाऱ्या बाजारातही शुकशुकाट आहे. रामनवमीनंतर (६ एप्रिल) मासळी मिळेल, अशी आशा मच्छीमारांना वाटत आहे. सध्या समुद्रामधील मासेमारीवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्यामुळे एलईडी मासेमारीचे प्रमाण कमी झाल्याचे येथील मच्छीमारांनी मच्छीमारांनी सांगितले; परंतु तरीही मासळी का मिळत नाही, याचे ठोस कारण त्यांना सांगता येत नाही. जोरदार वाऱ्यामुळे शिमगोत्सवानंतर मासेमारीला गेलेल्या नौका तिथेच समुद्रात नांगर टाकून थांबल्या आहेत, तर ७० टक्के नौका आंजर्ले खाडीतच नांगर टाकून आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनचा हंगाम खूपच खराब गेला आहे. गेल्या वर्षी काहीतरी निभाव लागला होता; परंतु यावर्षी अजूनही मासळी मिळालेली नाही.

त्यामुळे बंदरामध्ये शुकशुकाट आहे. या स्थितीमुळे मच्छीमार आणि व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. बोटीवर काम करणाऱ्या खलाशांचे पगार कसे द्यायचे, बोटीचा खर्च कसा काढायचा, मुलांचे शिक्षण, घरचा खर्च कसा भागवायचा अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत. होळीनिमित्त १३ ते १५ मार्चला सुटी होती. त्यामुळे तीन दिवस नौका बंदरात होत्या. शिमगोत्सवानंतर नव्या उत्साहाने मच्छीमारांनी समुद्रात जाण्याची तयारी सुरू केली होती. मासळीही चांगली मिळेल, अशी आशा त्यांना वाटत होती. मात्र, त्याचवेळी उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले. वाऱ्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे नौका मासेमारीला जरी गेल्या तरी वाऱ्यामध्ये जाळी गुरफटण्याचा धोका जास्त असतो. ही गुरफटलेली जाळी सोडवताना खूप नुकसान होते. एकेका जाळ्याची किंमत लाखो रुपये असते. त्यामुळे हे नुकसान सोसण्याची तयारी मच्छीमारांची नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular