बँकेची आणि जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करून ६७ लाखाचे कर्ज प्रकरण करणाऱ्या ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे. याप्रकरणी चौघांना याआधीच अटक झाली होती. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून उर्वरित एका आरोपीला अटक होताच न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. हे प्रकरण बनावट असल्याचे बँकेच्या लक्षात आल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, फसवणूकीची ही घटना ८ ते २६ जून या कालावधीत एस.व्ही.सी बँकेत घडली होती. याप्रकरणी अभिजित दिलीप जाधव (वय ३०, रा. कोहीनुर काँप्लेक्स, रत्नागिरी), संजय आत्माराम सुर्वे (वय ५३, रा. अंधेरी पूर्व, मुंबई), अरुण रामचंद्र शिंदे (वय ५५, रा. बोरीवली, मुंबई) अजित रामानंद राव (वय ५४, रा. कांदिवली, मुंबई) या ४ संशयित जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनरने पुढे चाललेल्या सुमो मोटारला पाठीमागून धडक दिली. सुमो मोटार कुडाळ येथून बेलापूरच्या दिशेने जात होती. सुमो मोटारीला कंटेनरची धडक बसल्यानंतर सुमोच्या पुढे चाललेल्या मालवाहू छोट्या टेम्पोला सुमोची धडक बसली.
यावेळी टेम्पो रस्त्याच्या बाजूला उलटला. टेम्पो चालक शमसुद्दिन खान व त्याचा एक सहकारी जखमी झाला. ते महाड येथून चिपळूण येथे झाडू विक्री करण्यासाठी आले होते. कागदपत्रांचे बनावटीकरण व त्यामध्ये फेरफार केला. त्यानंतर ती कागदपत्रे खरी आहेत, असे भासवण्यात आले. त्यावरून त्यांनी बँकेकडे ६७ लाखाचे कर्जप्रकरण सादर केले. त्यापैकी ४८ लाख कर्ज मंजूर करण्यात आले. दरम्यान ही कागदपत्र बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेने पैसे सोडले नाहीत. एस.व्ही.सी. बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात भादंवि कायदा कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.