अनुसूचित जाती, जमाती समुदायाच्या उन्नतीच्या उद्देशाने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून जलजीविका संस्थेने सागरी शेवाळ उत्पादन विषयावर व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे शिरगाव येथे आयोजन केले. कार्यक्रमात सागरी शेवाळ लागवडीच्या विविध पैलूंचा आणि त्याच्या आर्थिक शक्यतांचा अभ्यास करण्यात आला. जलजीविका संस्थेचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण तज्ज्ञ राज पवार यांनी प्रशिक्षणार्थीना सागरी शेवाळचे आर्थिक फायदे, बांबू आणि तराफा बांधणे, सागरी शेवाळ काढण्याच्या पद्धती, वाळवणे आणि प्रक्रिया करण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षिका अंकिता पाटील-गोखले यांनी आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता या सत्रांनी आधुनिक काळातील समुद्री शेवाळ शेतीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. सहभागींना सागरी शेवाळ लागवडीशी संबंधित सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन केले. आर्थिक साहाय्यासाठी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थीचे मूल्यांकन सृष्टी सुर्वे यांनी केले. जलजीविका संस्थेच्या ओंकार बळेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम झाला. समृद्धी सनगरे यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
भारतीय कृषी कौशल्य परिषदेद्वारे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागींची सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता वाढेल आणि त्यांच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थीसाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे विद्यावेतन तरतूद, सहभागींना प्रोत्साहन देणे आणि त्यांची वचनबद्धता कबूल करणे शिवाय समुद्री शेवाळ लागवडीमध्ये स्वारस्य दर्शवणाऱ्या उमेदवारांना अॅक्वाकल्चर तज्ज्ञांकडून तांत्रिक साहाय्य करण्यात येणार आहे.