31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून, सर्वसामान्यांची...
HomeRatnagiriस्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन

शहरातील पालिकेच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील समस्यांबाबत रंगकर्मींना आक्रमक झाले आहेत. गैरसुविधांमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याने रत्नागिरी रंगकर्मीनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढाच निवेदनाद्वारे वाचला. पंधरा दिवसांत नाट्यगृहातील समस्यांमध्ये सुधारणा केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडु, असा इशारा यावेळी रंगकर्मींनी पालिका प्रशासाला दिला.स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील दुरवस्थेबद्दल दिग्गज कलाकारांनी वारंवार भाष्य केले. कलाकार भरत जाधव याने तर केलेल्या वक्तव्याने चांगलाच वाद रंगला. रत्नागिरी शहराला सास्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराची बदनामी होत आहे. या गैरसोयीबाबत शहराला समस्त रंगकर्मींनी नाट्यगृहाच्या पायऱ्यावर बैठक घेऊन चर्चा केली. तेव्हा पालिकेला निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काल रंगकर्मींनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना समस्यांबाबत निवेदन दिले.

नाट्यगृहाचे नामफलक, नाटकाचं बोर्ड, बॅनर लावण्यासाठी निश्चित जागा, नाट्यगृहाच्या समोरील रस्त्यावर होणारे गाड्याचे पार्किंग, नाट्यगृहासाठी वॉचमन, प्रयोगाच्यावेळी साफसफाई आणि डागडुजीकरिता नाट्यगृहाचे प्रथमदर्शनी द्वार उघडण्यात यावे, सर्व स्वच्छतागृहांची डागडुजी, प्रेक्षकगृहातील नादुरुस्त खुर्च्या, खुर्ची क्रमांक, लाईटव्यवस्था यात सुधारणा करणे, संपूर्ण प्रेक्षकगृह इकॉस्टिव्ह करणे,नवीन वातानुकूलित यंत्रणा (विजेवर चालणारी) बसवणे, विंगाचे कापड बदलणे तसेच विंग पुढे-मागे करण्यासाठी ट्रॅकची लांबी रंगमंचाच्या दिशेने वाढवणे, पडद्याचे कापड बदलणे, मुख्य पडद्याची स्वच्छता राखणे, रंगपटातील आरशांवरील बल्ब, खिडक्यांचे पडदे आणि वातानुकूलित सेवा अद्ययावत करणे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. नाट्यगृहात भेडसावणाऱ्या अडचणीबाबत पुढील १५ दिवसांत पालिकेकडून कार्यवाही न झाल्यास समस्त रत्नागिरीकर रंगकर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. पालिकेचे मुख्याधिकारी रजेवर असल्याने हे निवेदन सहाय्यक मुख्याधिकारी माने यांना दिले.

अतिक्रमण हटवा – नाट्यगृहाच्या मागील बाजूला असलेल्या खाऊगल्लीतील अतिक्रमण तत्काळ हटवून रंगमंचाच्या मागून सामान मंचावर आणण्याचा मार्ग खुला करणे गरजेचे आहे. नाट्यगृहाच्या समोरच्या रस्त्यावर होत असलेले मिनीबस पार्किंग हटवून तेथील जागा नाट्यरसिकांना पार्किंगसाठी कायम उपलब्ध राहील अशी व्यवस्था करणेही गरजेचे असल्याची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular