27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriशीळ धरणातील पाणीसाठा आटला , जेमतेम १५ दिवस पाणी

शीळ धरणातील पाणीसाठा आटला , जेमतेम १५ दिवस पाणी

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातून एक दिवस आड पाणीपुरवठा केल्यास महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज पाणीपुरवठा केल्यास जेमतेम १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने रत्नागिरी मोठी पाणीटंचाई शहरवासियांना मोठी जाणवण्याची भीती आहे.शीळ धरणातून रत्नागिरी शहरवासियांना सध्या १६ ते १७ एमएलटी पाणी देण्यात येते. आजच्या घडीला शीळ धरणातील पाण्याचा साठा ०.४४४ दशलक्ष घनमीटर इतका आहे. दररोज पाणीपुरवठा केल्यास हे पाणी १५ दिवस पुरेल. सध्या शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिनाभर पाणीसाठा पुरू शकतो. दरम्यान एक दिवसाआड पाणी येत असल्याने रत्नागिरीकरांना खासगी टँकर्सवाल्यांकडून पाणी घेण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

५ हजार लिटर पाण्याचा टँकर घेतला तर आजवर ८०० रूपये द्यावे लागत होते. आता ५ हजार लिटरच्या टँकरसाठी ११०० रूपयांच्या आसपास पैसे मोजावे लागतात. यामुळे ६८ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेचे झाले काय? असा सवाल शहरवासिय करत आहेत. या योजनेचे काम ठेकेदाराने का अपूर्ण ठेवले आहे? याचीही चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या पाईपलाईनविषयीदेखील साशंकता असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी पाईप फुटतात, त्यामागे काय आहे याचीही उघड चर्चा सुरू आहे. पाण्याच्या दाबाने पाईप फुटतात असे जीवन प्राधीकरणच्यावतीने सांगण्यात येते. त्यामुळे पाईपच्या दर्जाविषयी अनेकांना शंका वाटते. हायड्रोलिक टेस्टिंग करावी अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular