21.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeMaharashtraअरबी समुद्रात 'बिपरजॉय' चक्रीवादळ घोंगावतयं - मान्सून लांबला

अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंगावतयं – मान्सून लांबला

अरबी समुद्रात खोल समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या कांही तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ पुढे सरकेल तशी पुढील १२ तासात त्याची तीव्रता वाढत या वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ असे नाव देण्यात आले. असून या वादळामुळे मान्सूनचे आगमन लांबणार आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे खोल समुद्रात आहे. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिम रांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

३ दिवस वादळी वारे – या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ८,९ आणि १० जून रोजी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वारे वाहतील. त्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर असण्याची शक्यता आहे. या काळात नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

झपाट्याने पुढे सरकतेय! –  हवामान विभागाने मंगळवारी दुपारपर्यंतच्या या वादळाच्या स्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. पुढील २४ तासांत उत्तरेच्या दिशेने ते पुढे सरकेल. मंगळवारी पहाटेच्या स्थितीचा अभ्यास. करून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. पुढच्या २४ तासात ते उत्तर दिशेने सरकणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निम णि झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, ‘अशी माहिती पुणे हवामान विभागाचे
प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

मान्सून आधी चक्रीवादळाचा धोका – मुंबई  हवामान विभागाने या संदर्भात ट्रिट करत सांगितलं की, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.

वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला – साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून भारतात दाखल होतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचणार आहे. मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झालं आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे.

मान्सूनचे आगमन लांबले – देशात मान्सूनचे आगमन लांबले आहे. राज्यात देखील मान्सून उशिराने. येणार आहे. याच दरम्यान, अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या. पट्ट्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत काळजी घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, यासंदर्भात हवामान विभाग मुंबईचे अधिकारी सुनील कांबळे म्हणाले की, काही मॉडेलनुसार चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात असली तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिलेला नाही. चक्रीय वात स्थितीनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण* होईपर्यंत पुढील स्थितीबद्दल सांगितले जात नाही असेही ते म्हणाले.

बिपरजॉय असे नाव – भारतीय हवामान विभागानुसार याबाबत ५ जूनला म्हणजेच सोम वारीच माहिती दिली होती. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात एक चक्रीवादळासारखी निर्माण होत आहे. यामुळे पुढील काही तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं होतं. या चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टी आणि उत्तरेच्या दिशेने सरकत जाईल, असं स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं म्हटलं आहे.

बांगलादेशने दिले नाव – चक्रीवादळाला बांगलादेशने बिपरजॉय, असं नाव दिलं आहे. ‘उष्ण कटिबंधातील चक्रीवादाळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नाव दिलं जातं. हिंदी महासागरातील चक्रीवादळांना नाव देण्यासाठी २००४ मध्ये एका सूत्रावर सहमती झाली होती. या क्षेत्रातील आठ देशांनी म्हणजेच भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांनी नावांची एक यादी दिली आहे. चक्रीवादळ येतं तेव्हा क्रमवारीनुसार ही नावं दिली जातात.

असं दिलं जातं नाव – लक्षात राहील, सहज उच्चारता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते अपमान करणारं आणि वादग्रस्त नसेल असं नाव चक्रीवादळाला दिलं जातं. ही नावं वेगवेगळ्या भाषेतूनही निवडली जातात. विविध भागातील नागरिक ते ओळखू शकतील. नामकर यंत्रणा काळानुसार विकसित केली गेली आहे. अभ्यासाच्या सुरुवातीला नावांची निवड वर्णानुक्रमाने केली जात होती. यात वर्णमालेतील प्रत्येक ‘अक्षरानुसार एक नाव दिलं जात होतं. पण ही यंत्रणा भ्रम निर्माण करणारी आणि लक्षात ठेवण्यासाठी अवघड होती. यामुळे सध्या असलेली प्रणाली विकसित करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular