25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriसंगमेश्वरातील फुणगूस खाडीपट्ट्याला पावसाचा तडाखा

संगमेश्वरातील फुणगूस खाडीपट्ट्याला पावसाचा तडाखा

विजेचा लोळ पडून यांच्या घराच्या भिंतीना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्टयाला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा असून कोंडये तसेच मेढे गावांत घरांवर वीजेचे लोळ तसेच झाड पडून म ोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततं आठ दिवस गडगडाट आणि लखलखाट करून येणाऱ्या परतीच्या पावसामुळे जनजीवनसुद्धा विस्कळीत झाले असून हातातोंडाशी आलेले भात पीक सततच्या पावामुळे वाया जाणार या भीतीत शेतकरी वर्गही धास्तावला आहे. गेले आठ दिवस दुपारनंतर पडणारा पाऊस अक्षरशः धुमशान घालत आहे. कानठळ्या बसतील असा गडगडाट, डोळे दीपावतील असा विजांचा लखलखाट आणि जोरदार सोसाट्याच्या वाऱ्याची सोबत घेऊन येणाऱ्या परतीचा पाऊस फुणगूस खाडी परिसरातील गावांत अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.

मंगळवारी रात्री खाडीभागात वीजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाची अविश्रांत बॅटिंग सुरु असतानाच कोंडये बोमेवाडी येथील संजय आत्माराम सावंत यांच्या घरावर कानठळ्या बसणारा आवाज होत विजेचा भलाम ोठा लोळ पडला. सावंत कुटुंबियांची अक्षरशः तारांबळ उडाली. संपूर्ण कुटुंब भयभीत झालं. मात्र जीवावरच घरातील विद्युत उपकरणावर निभावलं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही इजा कुटूंबीयांना झाली नाही.

भिंतीना तडे, विद्युत उपकारणे खाक – विजेचा लोळ पडून संजय सावंत यांच्या घराच्या भिंतीना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तर पंखे, फ्रिज, पाण्याचा पंप, वीज मिटर, घरातील, वीज फिटिंग जळून खाक झाल्याने सावंत कुटूंबाना चांगलाच फटका बसला आहे. सुरेश बोमे यांच्या घरावर सुद्धा वीज कोसळली आहे. सुदैवाने सर्व कुटुंबिय बचावले आहे. घरातील विद्युत उपकरणे मात्र जळून खाक झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीचा फटका – फुणगूस तलाठी कार्यालयाचे तलाठी, मंडळ अधिकारी, कोंडये गावचे सरपंच, पोलीस पाटील, महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून रीतसर पंचनामा केला. मेढे गावालासुद्धा परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला असून येथील ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र देसाई यांच्या घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या भल्यामोठ्या झाडावर वीज कोसळून झाडाच्या फांद्या घरावर पडल्या. त्यामुळे घरावरील पत्रे तुटून पावसाचे पाणी घरात येऊ लागले. त्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अशा अवस्थेत भर पावसात आणि विजप्रवाह नसल्याने काळोखात शेजारच्या लोकांच्या मदतीने घरावर पडलेल्या फांद्या मोठ्या कसरतीने बाजूला करून तुलेल्या पत्र्यांवर प्लाटीक टाकले.

तोपर्यंत संपूर्ण घराला तलावाचे रूप आले होते. पावसाच्या पाण्यामुळे सामानसुमान भिजून ओलेचिंब झाले. तसेच दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वीज प्रवाह सुरळीत करण्यात यश आले नव्हती. त्यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली असावीत किंवा निकामी झाली असावीत असा अंदाज आहे. मात्र वीज प्रवाह नसल्याने त्याची खातरजमा होऊ शकली नाही. मेढे गावातील सुहास सीताराम तोरसे यांच्या घरावर सोसाट्याच्या वाऱ्याने झाड कोसळून पत्रे तुटले. तसेच घरातील टीव्ही आदी विद्युत साहित्यांचे नुकसान झाले असून या दोन्ही ठिकाणचे पंचनामे तलाठी यांनी पूर्ण केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular